लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : सध्या बाहेर रोजगारासाठी गेलेल्यांचे स्वगृही आगमन झाले आहे. रेड झोनमधून आल्यामुळे स्वत:ला क्वारंटाईन करणे गरजेचे असताना तसे न करता गावात सर्रास फिरुन इतरांनाही धोक्यात आणण्याचे काम त्या मजुरांकडून होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दारुचे शौकीन तर कोणालाही जुमानत नसून बघून घेण्याच्या धमक्या देत असल्याने गावात दारू विक्री बंद करणे गरजेचे झाले आहे. यासाठी गावात पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी गावकरी करीत आहेत.येथून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या ग्राम सालईटोला येथील एका व्यक्तीचा स्वॅब नमूना पॉजिटिव्ह आल्याने परिसरात चर्चेला उधान आले आहे. त्याबरोबर गावात देशी दारुचे दुकान व मोहफुलाची दारु विक्री होत असल्याने जवळपासचे दारु शौकीन रात्री ८ च्या सुमारास गावभर फिरतात. अशातच दारुसाठी झुंबड होवून ‘फिजिकल डिस्टंन्सिगचा फज्जा उडतो व घरात राहणाऱ्यांची फजिती होते. यावर आळा घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त गरजेचे आहे.सध्या या परिसरात मुंबई, पुणे, हैदराबाद, गुजरात, नागपूर व आंध्र प्रदेशातून मजूर मोठ्या प्रमाणात स्वगृही परतले आहे. गावात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी आरोग्य विभाग, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील मेहनत घेताना दिसतात. तरीही सडक-अर्जुनी तालुक्यात एकाच दिवशी २८ रुग्णांचे स्वॅब नमूने पाजिटिव्ह आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही मजुरांनी एक आठवड्यापुर्वी स्वगृही प्रवेश केला होता व ते सर्रास फिरतही राहिले. परंतु प्रशासनाला उशीरा जाग आली व त्यांना २० मे पासून येथील जिल्हा परिषद शाळा तसेच आश्रमशाळेत क्वारंटाईन करण्यात आले. परंतु त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले नाही. आता मात्र घडलेल्या प्रकारानंतर गावकºयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.शेंडा हे गाव परिसरातील मुख्य ठिकाण असल्याने विनाकारण फिरणाºया लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी आता गावकरी करीत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावकरी दहशतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 5:00 AM
येथून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या ग्राम सालईटोला येथील एका व्यक्तीचा स्वॅब नमूना पॉजिटिव्ह आल्याने परिसरात चर्चेला उधान आले आहे. त्याबरोबर गावात देशी दारुचे दुकान व मोहफुलाची दारु विक्री होत असल्याने जवळपासचे दारु शौकीन रात्री ८ च्या सुमारास गावभर फिरतात. अशातच दारुसाठी झुंबड होवून ‘फिजिकल डिस्टंन्सिगचा फज्जा उडतो व घरात राहणाऱ्यांची फजिती होते.
ठळक मुद्देदारु विक्रीवर आळा गरजेचा : पोलीस बंदोबस्ताची केली मागणी