लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील रेल्वे स्टेशन गोंगले रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाते. सध्या या रेल्वे स्थानकांच्या नुतणीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रेल्वे स्थानकावर एखादी मालगाडी उभी असल्यास प्रवाशांना दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी मालगाडी खालून मार्ग काढवा लागतो. त्यामुळे मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावर गोंगले हे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावरुन सडक-अर्जुनी तालुक्यातील प्रवाशी गोंदिया व चंद्रपूरकडे प्रवास करतात. मागील काही दिवसांपासून येथील रेल्वे स्थानकाचे नुतणीकरणाचे काम सुरू आहे.त्यामुळे फलाटावर गाडी उभी असल्यास प्रवाशांना स्थानकाबाहेर व दुसºया फलाटावर जाण्यासाठी उभ्या असलेल्या रेल्वे गाडीखालून जावे लागते.ही बाब नियमबाह्य व धोकादायक असून यासर्व प्रकाराकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे प्रवासी निर्भयपणे अनेकदा रेल्वे गाडी उभी असताना त्याखालून ये-जा करतात. त्यामुळे एखाद्यावेळेस मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांची समस्या व भविष्यातील धोका लक्षात घेत या रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचे बांधकाम करण्याची मागणी पांढरी ग्रामपंचायतने पालकमंत्री बडोले यांच्याकडे ठराव घेवून केली होती. मात्र दीड वर्षाचा कालावधी लोटूनही या रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही.त्यामुळे प्रवाशांची समस्या कायम आहे.
जीव मुठीत घेऊन काढावा लागतो मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:51 AM
सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील रेल्वे स्टेशन गोंगले रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाते. सध्या या रेल्वे स्थानकांच्या नुतणीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रेल्वे स्थानकावर एखादी मालगाडी उभी असल्यास प्रवाशांना दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी मालगाडी खालून मार्ग काढवा लागतो.
ठळक मुद्देगोंगले रेल्वे स्थानकावरील प्रकार : पादचारी पुलाची गरज