खातिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे दलित समाजाला न्याय व समानतेचा हक्क मिळाला आहे. त्यांनी दलित समाजासाठीच नाही तर, सर्व दीनदुबळ्या लोकांसाठी हे कार्य केले असून त्यांचे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा कामठा सर्कलचे अध्यक्ष योगीराज वंजारी यांनी केले.
तालुक्यातील ग्राम छिपीया येथे भारतीय बौद्ध महासभा सर्कल कामठा व ग्राम शाखेच्या संयुक्त वतीने रविवारी (दि.१९) आयोजित वर्षावास कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्राम शाखा उपासक हिरा गेडाम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखाध्यक्ष एन. एल. मेश्राम, महासचिव कोमलकुमार नंदागवळी, उपाध्यक्ष मनोहर भावे, लिखनदास नंदागवळी, महिला उपाध्यक्ष अस्मिता उके, नरेंद्र गजभिये, सचिव विजय मेश्राम, मयाराम गजभिये, पोलीस पाटील अनिरुद्ध तांडेकर, बिजन उके, यशवंत खोब्रागडे, विजय डहाट, अनिता उके, माधुरी उके, रीना भीमटे, बबिता बन्सोड, वंदना खोब्रागडे, ललिता गेडाम उपस्थित होते. संचालन महासचिव मेश्राम यांनी केले. आभार ग्राम शाखा उपाध्यक्ष संतोष उके यांनी मानले.