कर्मचारी-अधिकारी कल्याण संघाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 09:51 PM2018-06-15T21:51:47+5:302018-06-15T21:51:47+5:30
जिल्ह्यात नव्याने रूजू झालेल्या जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांची संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष एच.आर. लाडे यांनी सदिच्छा भेट घेवून पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात नव्याने रूजू झालेल्या जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांची संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष एच.आर. लाडे यांनी सदिच्छा भेट घेवून पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी स्वागताला प्रतिसाद देत पुष्पगुच्छाऐवजी एखाद्या रोपट्याने स्वागत केले असते तर बरे झाले असते, असे म्हणाल्या. चर्चा करताना लाडे म्हणाले, आमची संघटना कर्मचारी, विद्यार्थी, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी, कुष्ठरोगी, भटक्या जाती-जमाती, विधवा, भूमिहिन, निराधार अशा व्यक्तींना शासकीय योजना समजावून सांगते. तसेच सामाजिक मेळावे घेवून मार्गदर्शन करते. व्यक्तीवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आपल्या समोर समस्या मांडते. या कार्यात आपले सहकार्य अपेक्षित आहे, अशी विनंती त्यांनी केले. यावर जिल्हाधिकारी बलकवडे यांनी संघटनेच्या चांगल्या कार्याला नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रामुख्याने एम.एन. नंदेश्वर, पवन वासनिक, रामचंद्र लिल्हारे, पारस लोणारे, कुणाल गणवीर, माधुरी टेंभुर्णीकर, जी.के. दियेवार, प्रशांत मांडवेकर, एच.जी. टेंभेकर, प्रशांत टेंभुर्णीकर, आनंद बोरकर, सिद्धार्थ उके, संजय मेश्राम आदी उपस्थित होते.