राजकारणात एकमेकांवर कुरघाेडी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही सोडत नाहीत. त्यातच केंद्रात भाजपचे तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष सातत्याने पहायला मिळतो. सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत. सध्या विरोधात असलेले कधी काळी सत्तेवर होते याचा देखील त्यांना विसर पडत आहे. यातच सरकारला कोंडीत पकडण्याची लगीनघाई विरोधकांना झाली आहे. मागील पंधरा ते वीस दिवस जिल्ह्यात पाऊस झाला नव्हता. त्यामुळे धानपीक संकटात आले होते. याचीच संधी साधत आणि शेतकऱ्यांची सहानुभूती कॅश करण्याच्या नादात भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करून टाकली. मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन पाठवून भाजपने शेतकऱ्यांप्रती कळवळा दाखवला. त्यांची ही मागणी रास्त असली तरी कदाचित ती निसर्गाला पटली नसावी. त्यामुळे दुष्काळाचे निवेदन देताच लगेच दोन तीन दिवसांनी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कोरड्या दुष्काळाचे जिल्ह्यावरील संकट तूर्तास तरी टळले आहे. शेवटी मागणी कुणाचीही असो पाऊस आला हे महत्त्वाचे.
कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:34 AM