लाभार्थ्यांना सक्षम बनविण्याचे काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 09:29 PM2018-06-23T21:29:24+5:302018-06-23T21:31:57+5:30

सामाजिक न्याय विभागा अंतर्गत दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना आणि आंतरजातीय विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभार्थ्यांना पूर्णपणे लाभ देऊन सक्षम बनविण्याचे काम करा.

Work to enable the beneficiaries | लाभार्थ्यांना सक्षम बनविण्याचे काम करा

लाभार्थ्यांना सक्षम बनविण्याचे काम करा

Next
ठळक मुद्देसी.एल. थुल : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सामाजिक न्याय विभागा अंतर्गत दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना आणि आंतरजातीय विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभार्थ्यांना पूर्णपणे लाभ देऊन सक्षम बनविण्याचे काम करा. असे प्रतिपादन राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थुल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी (दि.२२) दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना आणि आंतरजातीय विवाह योजनांबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जि.प.कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, समाज कल्याणचे प्रभारी सहायक आयुक्त संभाजी पोवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी तितीरमारे,वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक अंकेश केदार व सामाजिक कार्यकर्त्या शालिनी डोंगरे उपस्थित होत्या.
थुल म्हणाले, दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत २९ लाभार्थ्यांना समाज कल्याण विभागामार्फत जमीन मिळाली आहे. समाज कल्याण विभागाने कृषी विभागाशी समन्वय ठेवून लाभार्थ्यांना लाभ द्यावा. शासनाच्या शेळीपालन, कुक्कुटपालन व वीजजोडणी आदी योजनांचा प्रस्ताव राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी आंतरजातीय विवाह करणाऱ्या ४ लाभार्थी जोडप्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच मिळणारे अर्थसहाय्य वाढविण्यासंदर्भात शासनास प्रस्ताव सादर करण्यात येईल. महिलांना सक्षम करण्याकरीता स्वरोजगार उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे प्रभारी सहायक आयुक्त संभाजी पोवार यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांनी मानले.

Web Title: Work to enable the beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.