शेकडो बालकांवर कामाचे ओझे

By admin | Published: June 13, 2016 12:16 AM2016-06-13T00:16:31+5:302016-06-13T00:16:31+5:30

एकीकडे शासन बालकामगार विरोधी कायद्याचा आधार घेत १४ वर्षांपर्यंत वयोगटातील मुला-मुलींचा कामगार म्हणून उपयोग करण्यास सक्त बंदी ...

Workload of hundreds of children | शेकडो बालकांवर कामाचे ओझे

शेकडो बालकांवर कामाचे ओझे

Next

आॅपरेशन बालकामगार : कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी हातभार
विजय मानकर सालेकसा
एकीकडे शासन बालकामगार विरोधी कायद्याचा आधार घेत १४ वर्षांपर्यंत वयोगटातील मुला-मुलींचा कामगार म्हणून उपयोग करण्यास सक्त बंदी घालून त्यांना या वयात शिक्षण घेण्याचा अधिकार देणारा कायदा केलेला आहे. असे असूनसुद्धा आजही शेकडो बालके कामाच्या ओझ्याखाली वावरताना दिसून येत आहेत. ते शिक्षणाशिवाय मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहत असताना दिसून येतात.
आजही हॉटेल, रेस्टारेंट, सायकल स्टोर्स, किराना दुकान, चहाटपरी आदी ठिकाणी बालमजूर काम करताना दिसतात. तसेच विटाभट्टी, कवेलू निर्मिती, माती खोदकाम इत्यादीसाठीसुद्धा बाल मजुरांचा जास्त उपयोग केला जात असतो. ग्रामीण भागात कायद्याची पायमल्ली करुन सर्व कामे बालकांकडून करवून घेतली जातात. काही ठिकाणी बालकांना निर्दयतेने वागणूक देवून सर्व काम करवून घेण्याचे अमाणूस प्रकारसुद्धा सुरू आहेत.
भटक्या स्वरुपात जीवन जगणाऱ्या व भिक्षा मागणाऱ्या जमातीच्या लोकांनी तर आपल्या मुला-मुलींना वाऱ्यावर सोडून दिले आहे. दिवसभरातून किती भिक्षा मागून आणली याचा हिशोब रोज मागत असतात. त्यांनी अर्जित केलेले धन अंगमेहनतीतून नसले तरी त्यांचा उपयोग अमाणूसरित्या करवून घेतले जाते. पैसे गोळा करणे बालमजुरीपेक्षा जास्त भयावह असल्याचे दिसून येत असते.
चहा पिण्याचे निमित्त साधत आपल्या आॅपरेशनला मूर्तरूप देण्याचा विचार करीत एका हॉटेलात जावून बसलो. चहाचा आर्डर दिला . एक मुलगा चहा घेवून आला. त्याला पाणी आणायला सांगितले. तो पाणी घेवून आला. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बघत आपण त्याला काही प्रश्न विचारल्यास आपली माहिती देऊ शकते, असे वाटले. त्याला त्याचे नाव, गाव विचारले असता त्यांना सांगितले. येथे त्याला उल्लेख करणे बरोबर नाही. त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती घेताना मन विचलित झाल्याशिवाय राहिले नाही. त्यांनी सांगितले की, त्याचे वडील मजुरी करीत होते. एकदा आजारी पडले आणि काही दिवसांनी स्वर्गवासी झाले. त्यानंतर त्याच्या आईने घरची जबाबदारी सांभाळली. ती आता घरबांधणीच्या कामावर मजुरी करीत असते. जेव्हा त्याच्या शिक्षणाबद्दल विचारले असता सांगितले की, चौथीपर्यंत शाळा शिकला व मागील दोन वर्षापासून तो हॉटेलात काम करीत आहे. त्याला आणखी प्रश्न विचारले असता सांगितले की, त्यांची आईने कामातून कमविलेले पैसे घर चालविण्यासाठी पूर्ण खर्च होऊन जातात आणि मला आपल्या लहान बहिणीला शिकवायचे आहे. ती हुशार आहे. तिला कॉलेजपर्यंत शिकायचे आहे. म्हणून मी तिला पैसे कमवून देतो, असे म्हणाला. त्याला बघितल्यावर असे वाटले की विक्कीसुद्धा हुशार आहे. त्यालासुद्धा पुढे शिकण्याची इच्छा आहे. परंतु तो आपल्या बहिणीला शिकताना मदत करुन आपले समाधान शोधताना बालवयात काम करायला बाध्य झालेला दिसला.
यानंतर एका बालकाला आपल्या आई-वडिलांना हातभार लावण्याच्या नावाखाली अर्थाजनासाठी डोक्यावर ओझे घेवून फिरत असतानाचे प्रत्यक्ष दर्शन घरासमोर घडून आले. विवेक बादल पारधी नावाचा मुलगा काचेच्या बांगड्यांचे ओझे डोक्यावर घेवून घरासमोर येवून बांगळ्या खरेदी करण्यासाठी आग्रह करीत होता. बांगड्या बघण्यासाठी त्याच्या डोक्यावरील ओझे खाली उतरविण्यासाठी सावधतेने मदत करावी लागत असे. घरचे लोक बांगळ्या खरेदी करीत असताना त्याच्याशी संवाद साधला. त्याने सांगितले की तो मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्याचा असून यंदा सहावीमध्ये गेलेला आहे. परंतु आणखी दोन महिने बांगड्या विक्री करून गेल्यावर तो काही दिवस शाळेत जाईल. नंतर पुन्हा बांगळ्या विक्री करायला निघेल. अर्थात तो दफ्तर पाठीवर घेवून जाण्यापेक्षा डोक्यावर बांगळ्याचे ओझे जास्त काळ घेवून फिरत असतो.
असे विक्की आणि विवेक यांच्यासारखे कित्येक मुले-मुली आपले बालपणाचे स्वातंत्र्य विसरुन कामाच्या ओझ्याखाली आजही वावरताना दिसत आहेत. शासनाचे प्रतिनिधी याकडे जातीने लक्ष देतील काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होते.

सर्वाधिक बालमजूर हॉटेलमध्ये कामावर
शनिवारी बाल मजुरी विरोधी दिन लक्षात ठेवत विविध ठिकाणी भेटी दिल्या. यात अनेक ठिकाणी बालमजूर आढळून आले. परंतु सर्वात जास्त बालकांची संख्या हॉटेलसारख्या खाण्या-पिण्याच्या सोयीच्या ठिकाणी आढळून आली. त्यानंतर सायकल दुकाने, जनरल स्टोर्स, चहा टपरी इत्यादी ठिकाणी बाल कामगार आढळले. काही ठिकाणी घर बांधणीच्या कामातसुद्धा कमी वयाचे मुले-मुली कामे करताना आढळले. अशाच प्रत्यक्ष भेटीच्या अभियान चालवत असताना एका हॉटेलात एका विक्की नावाच्या मुलाने आपली हृदयस्पर्शी व्यथा सांगत खूपच प्रभावित केले.

Web Title: Workload of hundreds of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.