नगर परिषदेच्या निवडणुकीत युवकांना प्राधान्य देणार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:34 AM2021-09-15T04:34:07+5:302021-09-15T04:34:07+5:30
गोंदिया : शहरात अस्वच्छतेमुळे दुर्गंधी वाढली आहे. डेंग्यूसारख्या आजारांमुळे शहरवासी ग्रासले आहेत. बेवारस जनावरे, रस्त्यांचे हाल, वाहतुकीची समस्या गंभीर ...
गोंदिया : शहरात अस्वच्छतेमुळे दुर्गंधी वाढली आहे. डेंग्यूसारख्या आजारांमुळे शहरवासी ग्रासले आहेत. बेवारस जनावरे, रस्त्यांचे हाल, वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. नगर परिषदेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. याविरोधात येत्या काळात राष्ट्रवादी कॉँग्रेस बळकटपणे लढा देणार असून यासाठीच नगर परिषदेच्या निवडणुकीत युवकांना प्राधान्य दिले जाणार, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातील रेलटोली परिसरातील पक्षाच्या कार्यालयात आयोजित आवश्यक बैठकीत ते बोलत होते. बैठकीला देवेंद्रनाथ चौबे, अशोक शहारे, आशा पाटील, राजू एन. जैन, सुनील भालेराव, सतीश देशमुख, नानू मुदलियार, सचिन शेंडे, सुशीला भालेराव, कुंदा दोनोडे, लता रहांगडाले, दीपक पटेल, त्रिलोक तुरकर, निजाम शेख, रमेश कुरील, चंद्रकुमार चुटे, विकास शेंडे, दिलीप पाटील, महेंद्र टेेंभूर्णीकर, शैलेश वासनिक, सुनील पटले, प्रदीप लांजेवार, राहुल फुंडे, मोहित गौतम यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.