'या' १० कारणांमुळे थंडीच्या दिवसात वाढू शकतो कोरोनाचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 06:51 PM2020-10-19T18:51:05+5:302020-10-19T18:59:00+5:30

CoronaVirus News & Latest Updates : हिवाळ्यात कोरोनाची लाट आल्यास पुन्हा गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.  

10 reason of why coronavirus in winter covid-19 cases may increase in india in winter | 'या' १० कारणांमुळे थंडीच्या दिवसात वाढू शकतो कोरोनाचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

'या' १० कारणांमुळे थंडीच्या दिवसात वाढू शकतो कोरोनाचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Next

चीनच्या वुहानमध्ये 2019 च्या  शेवटी कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला सुरूवात झाली होती. जवळपास दोन ते तीन महिन्यांमध्ये कोरोना व्हायरस जगभरातील अनेक देशांमध्ये पसरला. उन्हाळ्याच्या वातावरणात कोरोना व्हायरस तग धरू शकणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. पण असं काहीही झालं नाही. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस जास्तच वाढत गेला. आता थंडीचे दिवस सुरू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा  कोरोनाची लाट येणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण हिवाळ्यात कोरोनाची लाट आल्यास पुन्हा गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.  

नीती आयोगाचे सदस्य व्ही. के पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संक्रमणाची दुसरी लाट हिवाळ्यात येण्याचा धोका जास्त आहे.  थंडीच्या दिवसांना सुरूवात होत आहे तसंतस युरोपातही रुग्णसंख्या वाढायला सुरूवात झाली आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यावरून कोरोनाची लाट हिवाळ्यात येण्याची शक्यता आहे  हे स्पष्ट होतं. 

ब्रिटनमध्ये हिवाळा सुरू झाल्यानंतर  कोरोना रुग्णांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाली.  हिवाळ्यात ब्रिटनमध्ये 1.20 लाखांपेक्षा जास्त मृत्यू होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. कोरोना व्हायरस नोव्हेंबरच्या दरम्यान चीनमधून इतर ठिकाणी पसरला होता म्हणून आता हिवाळ्याचे दिवस जसजसे जवळ येतील तसतसं संक्रमणाचा धोका वाढू शकतो असं मत काही तज्ज्ञांचे आहे. 

हिवाळ्याच्या वातातवरणात व्हायरल इन्फेक्शन, फ्लूसारखे इतर आजार वाढण्याची शक्यता असते. कोरोनामुळे हे व्हायरल संक्रमण पसरत असल्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे. पण आतापर्यंत कोणत्याही संशोधनातून ही बाब सिद्ध झालेली नाही. यापूर्वीच्या माहामारींवर लक्ष दिल्यास समजून येते की, स्पॅनिश फ्लू, आशियाई फ्लू, हॉंगकॉंग फ्लू यांसारख्या आजारांचा प्रभाव 6 महिन्यांनी कमी झाल्यानंतर पुन्हा दुसरी लाट आली होती. म्हणून कोरोनाची दुसरी लाटही येऊ शकते असं मत तज्ज्ञांचे आहे.

प्रतीकात्मक तस्वीर

भारतात सध्या हळूहळू अनलॉक व्हायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे वाहतूक, समारंभ, सार्वजनिक ठिकाणींची गर्दीही वाढत आहे. मोठया प्रमाणात लोक दूरवर प्रवास करत आहेत. या कारणांमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. हवामानात बदल झाल्यामुळे कोरोनाच्या प्रसारावर कसा परिणाम होईल याची कल्पना कोणालाही देता येणार नाही. कारण उन्हाळ्यात कोरोनाचा प्रभाव कमी होईल असं अनेकांना वाटलं होतं. पण असं न होता दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत होती. पॉझिटिव्ह बातमी! शास्त्रज्ञांनी शोधलं कोरोनाला नष्ट करण्याचं नवं तंत्र, आता विषाणूंची वाढ रोखता येणार

अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे की, हिवाळ्यात श्वासांसबंधी समस्या वाढतात. उदा, महाराष्ट्रातही स्वाईन फ्लू पसरण्याची अनेक उदाहरण सापडली आहे. अशा स्थितीत  कोरोना व्हायरसचाही प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. जल, वायू या क्षेत्रात काम करत असलेले ग्रीनपीस इंडियाचे अविनाश चंचल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हवा प्रदूषण वाढल्यास श्वसनासंबंधी आजार उद्भवण्याचा धोका  जास्त असतो.  प्रदुषणामुळे फुफ्फुसं खराब होऊन कार्यक्षमता कमी होते. त्यातून न्यूमोनिया, कोविड 19 यांसारखे गंभीर आजार उद्भवण्याचा धोका असू शकतो. कोरोना संसर्गामुळे शरीरावर होत आहेत 'असे' परिणाम; तज्ज्ञांनी केला खुलासा, जाणून घ्या उपाय

Web Title: 10 reason of why coronavirus in winter covid-19 cases may increase in india in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.