राज्यात स्वाइन फ्लूचे १०२ नवे रुग्ण

By admin | Published: August 31, 2015 09:43 PM2015-08-31T21:43:57+5:302015-08-31T21:43:57+5:30

- दोघांचा मृत्यू

102 new cases of swine flu in the state | राज्यात स्वाइन फ्लूचे १०२ नवे रुग्ण

राज्यात स्वाइन फ्लूचे १०२ नवे रुग्ण

Next
-
ोघांचा मृत्यू
पुणे : राज्याला पुन्हा स्वाइन फ्लूचा विळखा बसू लागला असून गेल्या २ दिवसांत या आजाराची लागण झालेले १०२ नवे रुग्ण सापडले, त्यामुळे राज्यातील लागण झालेल्यांची संख्या ६ हजार ८४३ वर पोहोचली आहे. तर, आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने यात बळी पडलेल्यांची संख्या ६२३ वर पोहोचली.
स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांमध्ये एक पुणे ग्रामीण भागातील तर दुसरा नाशिक ग्रामीण भागातील आहे. राज्यात शनिवारी स्वाइन फ्लूची लागण झालेले ६८ तर रविवारी ३४ रुग्ण सापडले. या दोन दिवसांत राज्यातील ३ हजार २८६ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३०४ संशयितांना स्वाइन फ्लूविरोधी ऑसेलटॅमिवीर औषधे देण्यात आली. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या ३९१ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
स्वाइन फ्लूची लागण झाल्यानंतर उपचारास उशीर केल्याने ३३ जणांच्या जीवावर हा आजार बेतला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: 102 new cases of swine flu in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.