खुर्चीवर बसल्या बसल्या करा 'या' ४ एक्सरसाइज, पोटावरील चरबी होईल गायब!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 10:55 AM2019-04-12T10:55:31+5:302019-04-12T10:56:12+5:30
सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमध्ये जाडेपणा आणि वाढतं पोट ही मोठी समस्या झाली आहे.
(Image Credit : DavidWolfe.com)
सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमध्ये जाडेपणा आणि वाढतं पोट ही मोठी समस्या झाली आहे. ऑफिसमध्ये एकाच जागेवर बसून काम करावं लागणाऱ्या लोकांमध्ये या समस्या अधिक बघायला मिळतात. डेस्कजॉब दरम्यान कोणतीही मुव्हमेंट किंवा फिजिकल अॅक्टिविटी होत नाही, याचाच प्रभाव म्हणजे बाहेर आलेलं पोट किंवा जमा झालेल्या चरबीच्या रुपाने बघायला मिळतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला पाच अशा एक्सरसाइज सांगणार आहोत, ज्या तुम्ही खुर्चीवर बसल्या बसल्या करू शकता.
कॅट काऊ
एका खुर्चीवर बसा. हात पायांवर किंवा समोर टेबलवर ठेवा. आता वरच्या दिशेने बघताना छाती समोरच्या बाजूने करा आणि खांदे मागच्या बाजूने ढकला. नंतर मान खाली करुन पोट आत-बाहेर करणे सुरु करा. छाती बाहेरच्या दिशेने फुगवताना मोठा श्वास घ्या आणि आतल्या बाजूने जाताना श्वास सोडा. ही एक्सरसाइज कमीत कमी ३ ते ४ वेळा रिपीट करा.
हॅंगिंग बॉडी
एका खुर्चीवर बसून हात खुर्चीच्या हॅंडलवर ठेवा. आता हातांच्या आधाराने शरीर वर उचला. हे करत असताना पाय वर उचलून सरळ करा आणि खालीवर करा. यादरम्यान श्वास घेत रहा आणि सोडत रहा. या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला पाय ९० डिग्री अॅंगलमध्ये ठेवावे लागतील.
उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे मुव्हमेंट
खुर्चीवर बसून पाठ सरळ करा आणि हात टेबलवर ठेवा. शरीर आणि टेबलमध्ये थोडं अंतर ठेवा. आता शरीर उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे वळवा. वही एक्सरसाइज ४ ते ५ वेळा रिपीट करा. नेहमी ही एक्सरसाइज केल्याने पोटावरील चरबी कमी होईल.
कोर चॅलेंज
ही एक्सरसाइज करताना तुमची पाठ सरळ ठेवा आणि पाठीच्या मांसपेशीवर प्रेशर टाका. तुमचं शरीर आणि पाय एकाचवेळी विरुद्ध दिशेने वळवा. म्हणजे जर तुमचं शरीर उजवीकडे आहे तर पाय डावीकडे वळवा. असंच ३ ते ४ वेळा करत रहा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसू शकतो.