​फ्रिजमध्ये 'या' गोष्टी ठेवताच बनतात विष, डॉक्टर म्हणाले कॅन्सरचा होऊ शकतो धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:40 AM2024-01-25T10:40:28+5:302024-01-25T10:40:58+5:30

सामान्यपणे खाण्या-पिण्याच्या गोष्टी स्टोर करण्यासाठी जास्तीत जास्त लोक फ्रिजचा वापर करतात.

4 foods do not put in fridge that can be cause of cancer cells according to doctor | ​फ्रिजमध्ये 'या' गोष्टी ठेवताच बनतात विष, डॉक्टर म्हणाले कॅन्सरचा होऊ शकतो धोका!

​फ्रिजमध्ये 'या' गोष्टी ठेवताच बनतात विष, डॉक्टर म्हणाले कॅन्सरचा होऊ शकतो धोका!

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी केवळ चांगलं खाणंच नाहीतर बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तुम्ही काय कधी खाता, कसं खाता हेही महत्वाचं आहे. त्यासोबतच तुम्ही खाण्या-पिण्याच्या गोष्टी कशा स्टोर करता हेही तितकंच महत्वाचं आहे.

सामान्यपणे खाण्या-पिण्याच्या गोष्टी स्टोर करण्यासाठी जास्तीत जास्त लोक फ्रिजचा वापर करतात. बरेच लोक फ्रिजमध्ये अशाही गोष्टी ठेवतात ज्या त्यात ठेवायला नको. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवून वाचवले जाऊ शकतात, पण काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणं घातक ठरू शकतं. हे पदार्थ काही दिवसात विषारी बनतात.

डॉक्टर विनोद शर्मा यांच्यानुसार, रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही गोष्टी चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. कारण यात लवकर फंगस तयार होतं म्हणजे त्यांना बुरशी लागते आणि यामुळे शरीरात कॅन्सरची गाठ होऊ शकते.

 

भात

अनेकदा असं होतं की, लोक जास्त भात बनवतात आणि शिल्लक भात फ्रिजमध्ये ठेवतात. भात 24 तासांपेक्षा जास्त फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नये. कारण याला फंगस लागतं आणि फंगसमधील बॅक्टेरिया शरीरात कॅन्सरची गाठ बनवू शकतात.

आले

बरेच लोक बाजारातून ठोक भावाने आलं खरेदी करतात आणि फ्रिजमध्ये स्टोर करतात. ही बाब तुम्हाला फार महागात पडू शकते. आल्यामध्ये फार लवकर फंगस होऊ शकतं आणि याच्या सेवनाने किडनी आणि लिव्हर डॅमेज होऊ शकतं.

कांदे

कांदा बरेच लोक जास्त प्रमाणात खरेदी करतात. बरेच लोक कांदे फ्रिजमध्ये स्टोर करतात. पण कांद्याचा फ्रिजमध्ये फार लवकर बुरशी लागते आणि यातील बॅक्टेरिया आरोग्यासाठी नुकसानकारक असतात.

लसूण

लसूणही बरेच लोक जास्त प्रमाणात खरेदी करतात आणि ते फ्रिजमध्ये ठेवतात. अशी चूक करणं टाळलं पाहिजे. कारण लसणालाही लवकर बुरशी लागते. खासकरून सोसलेल्या लसणाला लवकर बुरशी लागते.

Web Title: 4 foods do not put in fridge that can be cause of cancer cells according to doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.