शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी दररोज ७-८ तासांची झोप (Sleep) घेणं आवश्यक आहे. पुरेशी झोप घेण्याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. मात्र, पुरेशी झोप घेतल्यानं लठ्ठपणा कमी होण्यासाठी फायदा होतो, हे तुम्हाला माहीत आहे का? होय, जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, जेवढं योग्य आहार घेणं, व्यायाम करणं महत्त्वाचं आहे तितकंच पुरेशी झोप घेणंही महत्त्वाचं आहे.
आजच्या जीवनशैलीत बहुतेक लोक ६ तासांची झोपही घेत नाहीत. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, अमेरिकेत राहणारे सुमारे ३५ टक्के प्रौढ ७ तासांपेक्षा कमी झोपतात. सात तासांपेक्षा कमी झोप ही कमी झोप (Short Sleep) मानली जाते. ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही, त्यांचा लठ्ठपणा वाढतो किंवा तो कमी होणं कठीण होतं असं अनेक अभ्यासांमधून (Sleeping Benefits for Weight Loss) सिद्ध झालंय.
कमी झोपल्यामुळं होतं हे नुकसानजर तुम्ही दररोज ६ तासांपेक्षा कमी झोपत असाल तर, त्यामुळं चिडचिड, चंचल मनस्थिती (mood swings), थकवा, आळस, कमी ऊर्जा पातळी, पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसंच वजन कमी करणं कठीण होऊ शकतं.
कमी झोपल्यानं भूक वाढतेतुम्ही जितकी कमी झोप घ्याल, तितकी भूक जास्त लागेल. पुरेशी झोप न घेणारे लोक पुरेशी झोप घेणार्यांपेक्षा जास्त खात असतात. याचं कारण म्हणजे कोणत्याही व्यक्तीची झोप त्याच्या भूक वाढवणाऱ्या घ्रेलिन (Ghrelin) आणि लेप्टिन (Leptin) या दोन महत्त्वाच्या संप्रेरकांवर परिणाम करत असते. घ्रेलिन मेंदूला भुकेचा संकेत देतं, तर चरबीच्या पेशींमधून बाहेर पडणारं लेप्टिन हे संप्रेरक भूक कमी करतं आणि मेंदूला परिपूर्णतेचा संकेत देतो. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा शरीर अधिक घ्रेलिन बनवतं आणि लेप्टिनचं उत्पादन कमी करतं. यामुळं तुम्हाला भूक लागते आणि तुम्ही जास्त खाऊ लागता.
कमी झोपणारे लोक जास्त कॅलरीज घेतातजे लोक कमी झोपतात ते जास्त कॅलरी घेतात. भूक वाढल्यामुळं असं घडतं. यामुळं तुम्ही तुमची भूक शांत करण्यासाठी काहीही समोर येईल ते खाण्यास सुरुवात करतात. कारण, जर तुम्ही वेळेवर झोपला नाहीत, तर भुकेमुळं तुम्ही आरोग्याला अपायकारक असलेले स्नॅक्स, जंक फूड, तळलेले पदार्थ आदी खाऊ लागता. ज्यामुळं लठ्ठपणा कमी होण्याऐवजी वाढू लागतो.
कमी झोपल्यास चयापचयाची क्रिया होते प्रभावितजेव्हा तुम्ही झोपता तेव्हा कॅलरीज बर्न होतात. विश्रांतीच्या वेळत चयापचयाच्या क्रियेचा एक ठराविक दर असतो. यासाठी तुम्ही झोपेत असतानाही कॅलरीज बर्न केल्या जातात. विश्रांतीच्या वेळेत कॅलरीज बर्न होण्याचं प्रमाण वय, स्नायू, वजन, उंची, लिंग यानुसार असतं. कमी झोपल्यामुळं विश्रांतीच्या वेळेतील चयापचयाच्या दरावर परिणाम होऊन तो कमी होतो.
कमी झोपेमुळे लठ्ठपणा वाढतो७ तासांपेक्षा कमी झोपल्यास बॉडी मास इंडेक्स (BMI) आणि वजन वाढू लागते. जे लोक ७ तासांपेक्षा कमी झोपतात त्यांचं वजन इतरांपेक्षा जास्त वाढतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर उठणं आणि झोपणं याचं ठराविक वेळापत्रक बनवा. जेव्हा तुम्ही दररोज सात ते आठ तास झोपाल तेव्हा तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आरामदायी वाटेल.
पुरेशी झोप घेतल्याचे फायदे
- चांगली आणि गाढ झोप घेतल्यानं मन शांत होतं.
- मूड फ्रेश राहतो. आळस दूर होईल आणि कामात लक्ष लागेल.
- उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या होत नाही.
- ७ ते ८ तासांची झोप तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते.
- तणाव, चिंता यांसारख्या मानसिक समस्या टाळल्या जातात.