डॉक्टरांचा दावा चिकनपेक्षाही 'या' डाळीत असते शक्ती, पण काही लोकांना होते समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 12:49 PM2024-01-23T12:49:23+5:302024-01-23T12:49:56+5:30

उडीद डाळीत न्यूट्रीशनल व्हॅल्यू फार जास्त आहे. यात भरपूर प्रमाणात डायटरी फायबर असतं.

According to Ayurveda doctor urad dal gives high protein like chicken for vegetarian know how to eat | डॉक्टरांचा दावा चिकनपेक्षाही 'या' डाळीत असते शक्ती, पण काही लोकांना होते समस्या

डॉक्टरांचा दावा चिकनपेक्षाही 'या' डाळीत असते शक्ती, पण काही लोकांना होते समस्या

Health benefits of Urad Dal :  उडदाची डाळ खायची म्हटलं तर अनेकजण नाक मुरडतात. अनेकांना ही डाळ चिकट होते म्हणून आवडत नाही. पण उडदाच्या डाळीचे जर तुम्ही फायदे वाचले तर तुम्ही नियमितपणे या डाळीचा आहारात समावेश कराल. इतकंच काय तुम्ही आवडीने ही डाळ खाल आणि इतरांनाही खायला सांगाल. 

उडीद डाळीचे फायदे

उडीद डाळीत न्यूट्रीशनल व्हॅल्यू फार जास्त आहे. यात भरपूर प्रमाणात डायटरी फायबर असतं. तेच आयर्न, प्रोटीन पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन बी सुद्धा भरपूर प्रमाणात असतात.

1) हाडांसाठी फायदेशीर

उडीद डाळ हाडांसाठी फार फायदेशीर असते. उडीद डाळीत पोटॅशिअम, कॅल्शिअम, फॉस्फोरससारखे तत्व भरपूर प्रमाणात असतात. याने हाडे मजबूत होतात. ही डाळ खाल्ल्याने  ऑस्टियोपोरोसिससारख्या आजाराचा धोका कमी होतो.

2) हृदयासाठीही फायदेशीर

उडीद डाळीत पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं. ज्याने ब्लड वेसेल्स आणि आर्टरीजमध्ये तणाव कमी होतो. अर्थातच याने हृदय निरोगी आणि फीट राहतं.

3) वेदना आणि सूज होते दूर

उडीद डाळीमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सीडेंट असतात जे वेदना आणि सूज कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. याने मांसपेशी आणि जॉइंटमधील वेदना कमी होते.

4) ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल होते

डायटरी फायबचं जास्त प्रमाण असल्याने उडीद डाळ ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते. डायबिटीसच्या रूग्णांसाठी उडीद डाळ फायदेशीर असते.

5) डायजेशनमध्ये प्रभावी

जर तुम्हाला डायजेशनसंबंधी समस्या असेल तर उडीद डाळ तुम्हाला फायदा देईल. यात फायबर असतात. जे पोषक तत्व अवशोषित करण्यास मदत करतात. याच फायबरमुळे पोटाची समस्याही दूर होते.

Web Title: According to Ayurveda doctor urad dal gives high protein like chicken for vegetarian know how to eat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.