जगभरात कोरोना व्हायरसच्या (CoronaVirus) लसीकरणाला सुरूवात झाली असून आता या माहामारीच्या जाळ्यात अडकणाऱ्यांची संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. भारतात १० ते १२ हजार कोरोना व्हायरसच्या केसेस समोर येत आहेत. हजारो लोकांना रोज लसीचा डोससुद्धा दिला जात आहे. पण तरिही काही देशात व्हायरसचा प्रसार अजिबात थांबताना दिसून येत नाही. या माहामारीला लवकरात लवकर हरवता येईल अशी आशा लोकांना आहे. यादरम्यान कोरोनाच्या कहरात एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. कोरोनाची नेजल स्प्रे (Intranasal vaccines) लस तयार केली जात आहे. हैदराबादची कंपनी भारत बायोटेक ही नेजल स्प्रे लस तयार करत आहे. कोरोना व्हायरसला रोखणारी कोवॅक्सिन तयार झाल्यानंतर आता नेजल स्प्रेसुद्धा तयार केला जाणार आहे.
भारत बायोटेकच्या प्रयोगशाळांमध्ये माणसांवर परिक्षण सुरू असून नेजल स्प्रेबाबत वादविवाद सुरू आहेत. माणसांसाठी ही लस सुरक्षित आहे की नाही याबाबत मदभेद आहेत. याच्या तपासणीसीठी भारताच्या ड्रग रेग्यूलेटरच्या एक्सपर्ट्स कमेटीनं भारत बायोटेक आणि फेज १ त्या क्लिनिकल ट्रायल्सना मंजूरी दिली आहे. नीती आयोगासह अनेक हेल्थ एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार माहामारीला नष्ट करण्यासाठी ट्रायल्सना मंजूरी देण्यात आली असून माहामारीला नष्ट करण्यासाठी नेझल स्प्रे गेम चेंजर म्हणून प्रभावी ठरू शकतो. याशिवाय या नेझल स्पेचे अनेक फायदे सुद्धा आहेत.
जाणून घ्या काय आहे नेझल स्प्रे
कोरोनाची लस तुम्हाला एखाद्या इंजेक्शनच्या माध्यमातून हाताला लावली जाते. ज्याप्रमाणे तुम्ही इतर लसी टोचून घेता. सामान्य भाषेत याला इंट्रामस्कुलर लस असं म्हणतात. तर नेजल स्प्रे लस हाताने नाही तर नाकाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. ही लस नाकाच्या माध्यमातून शरीरात जाऊन श्वसन मार्गात प्रवेश करेल. अशा पद्धतीनं या लसीची रचना करण्यात आली आहे. नाकात काही थेंब घालून दिल्या जात असलेल्या लसीला इंट्रानेजल लस असं म्हणतात.
जे इंजेक्शन टाळत आहेत किंवा असे डोस घेतल्यानंतर ज्यांना वेदना आणि सूजेची समस्या आहे त्यांच्यासाठी नेझल स्प्रे एक चांगला पर्याय आहे. आपल्याला नेझल स्प्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही कारण त्याचा डोस शरीरात नाकातून दिला जातो. त्याचे डोस थेट नाकातून श्वसनमार्गामध्ये प्रवेश करतात. ते अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध होऊ शकते. आरोग्य तज्ञ त्यास कोरोना साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी या स्प्रे ला गेमचेंजर म्हणत आहेत.
फायदे
नेजल स्प्रे लस फक्त कोरोना व्हायरसपासून बचाव करत नाही इतर आजार रोखण्यासाठीही परिणामकारक ठरते. कोरोनाव्हायरस ज्या वेगाने पश्चिमी देशात पसरत आहे. ते पाहता नेजल स्प्रे लस कोरोना व्हायरसला रोखण्यात गेम चेंजर ठरू शकते.
ही एक नेजल डोसची लस आहे, म्हणून ट्रॅक करणे सोपे आहे. इंट्रामस्क्युलर लसीच्या तुलनेत त्याचे दुष्परिणाम देखील कमी आहेत. यामुळे सुया आणि सिरिंजचा वापर थांबेल आणि कचरा कमी होईल. त्याचे डोस त्वरीत शरीरात रोग प्रतिकारशक्ती प्रदान करतात आणि संसर्ग प्रतिबंधित करतात. जबरदस्त! रोज एक कप कॉफी प्यायल्याने 'या' गंभीर आजाराचा धोका होतो कमी, रिसर्चमधून खुलासा....
तज्ज्ञ काय म्हणतात?
मागच्या काही दिवसात नेझल स्प्रे कोरोना लसीबाबत दिल्लीतील एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, नेजल स्प्रे लस शाळेच्या मुलांना देण्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं सौम्य स्वरूपाची असतात. पण त्यामुळे गंभीर इन्फेक्शन पसरू शकतं. अशा स्थितीत नेजल स्प्रे लस कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वनस्पती तूपातल्या जेवणामुळे होऊ शकतात हे गंभीर आजार; शरीर कधी पोकळ होईल कळणारही नाही