लगेच दूर होईल मानेचा काळा रंग, घरीच करा हे 5 बेस्ट उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 04:03 PM2024-03-29T16:03:56+5:302024-03-29T16:04:28+5:30
Black Neck : जर तुमच्या मानेचाही रंग काळा झाला असेल तर आम्ही काही खास टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.
Black Neck :चेहऱ्याची काळजी घेणं किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. कारण सगळ्यात आधी चेहरा दिसतो. पण बरेच लोक ज्या गोष्टी दिसत नाहीत त्यांची फारशी काळजी घेत नाहीत. जसे की, मान. लोक आपल्या मानेवर पूर्णपणे दुर्लक्ष करतात. याकारणाने मान दिवसेंदिवस काळी होत जाते. जर तुमच्या मानेचाही रंग काळा झाला असेल तर आम्ही काही खास टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.
बेकिंग सोडा
दोन चमचे बेकिंग पावडर घ्या. त्यात पाणी मिश्रित करुन एक सेमी लक्विड तयार करा. हे मिश्रण काही वेळ मानेवर लावून ठेवा. त्यानंतर मान पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून काही दिवस हा उपाय केल्यास मानेचा काळेपणा दूर होण्यात मदत होईल.
कच्ची पपई
कच्ची पपई कापून त्याचे तुकडे करा. आता या तुकड्यांमध्ये गुलाबजल आणि एक चमचा दही टाकून मिश्रण तयार करा. ही पेस्ट मानेवर लावून काही वेळ सुकू द्या. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुम्हाला फरक दिसायला लागेल.
लिंबू आणि मध
लिंबू आणि मध एकत्र करुन एक पॅक तयार करा. हा पॅक काही वेळेसाठी मानेवर लावून ठेवा. आंघोळ करताना मान चांगली स्वच्छ करा. या उपायाने मानेचा काळेपणा आणि सुरकुत्याही दूर होती.
लिंबू
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी हे तत्व असल्याने ते एका नैसर्गिक ब्लीचप्रमाणे काम करतं. आंघोळ करण्याआधी लिंबू मानेवर हलक्या हाताने घासा. आठवड्यातून दोन-तिनदा लिंबाचा असा वापर केल्यास फायदा होईल.