सिद्धू यांच्या पत्नीने ४० दिवसात कॅन्सरला दिली मात, जाणून घ्या काय होता आयुर्वेदिक आहार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:53 AM2024-11-23T10:53:06+5:302024-11-23T10:55:09+5:30
सिद्धू यांनी सांगितलं की, आपण टेस्टच्या नादात संपूर्ण शरीर खराब करतो. पण आम्ही पूर्ण अभ्यास करून डाएट सुरू केली.
माजी क्रिकेटपटू आणि नेते नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज ४ चा कॅन्सर निदान झाला होता. हा कॅन्सर इतका वाढला होता की, डॉक्टरांनी जगण्याची केवळ ३ टक्के आशा व्यक्त केली होती. तरीही त्यांच्या पत्नीने हार न मानता, सर्जरी, थेरपी आणि इच्छाशक्तीसोबत लाइफस्टाईलवर लक्ष दिलं. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, आता त्यांची पत्नी पूर्णपणे कॅन्सरमधून बाहेर पडली असून यात डाएटने तिला खूप मदत केली.
सिद्धू यांनी सांगितलं की, आपण टेस्टच्या नादात संपूर्ण शरीर खराब करतो. पण आम्ही पूर्ण अभ्यास करून डाएट सुरू केली. ज्यानंतर ४० दिवसांमध्येच ४ स्टेजच्या कॅन्सरमधून बाहेर पडता आलं. ही डाएट कॅन्सरशिवाय फॅटी लिव्हर कमी करण्यासही मदत करते. त्यांनी २५ किलो वजनही कमी केलं. ज्या डाएटचा सिद्धू यांनी उल्लेख केला ती पूर्णपणे आयुर्वेदिक आहे.
My wife is clinically cancer free today ….. pic.twitter.com/x06lExML82
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) November 21, 2024
सिद्धू यांनी सांगितलं की, कॅन्सरला हरवण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये बदल करावा लागतो, जो कॅन्सरचा उपचार आहे तोच फॅटी लिव्हरचाही आहे. तुम्ही कॅन्सर सेल्सना शुगर आणि कार्बोहायड्रेट्स देऊ नका. कॅन्सरच्या पेशी आपोआप नष्ट होतील.
कॅन्सरमध्ये घेतला असा चहा
सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीने कॅन्सरच्या उपचारादरम्यान हर्बल चहा घेतला. यासाठी दालचीनी, काळी मिरी, लवंग, छोटी वेलची टाकून पाण्यात टाकून उकडली. यात थोडा गूळ टाकला होता.
Treatment + Diet - Great combination for Cancer cure! pic.twitter.com/Q8y4DPfGV3
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) November 22, 2024
जेवणाची वेळ महत्वाची
सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांची पत्नी सांयकाळी ६ ते ६.३० वाजता जेवण करत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता लिंबू पाण्याने सुरूवात करत होती. डाएटमध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-कॅन्सर असलेले फूड्स होते.
कशी व्हायची दिवसाची सुरूवात?
सगळ्यात आधी लिंबू पाण्याने दिवसाची सुरूवात होत होती. त्यासोबत कच्ची हळद, एक लसूण आणि अॅपल व्हिनेगर दिलं जात होतं. त्यासोबतच अर्ध्या तासानंतर १० ते १२ कडूलिंबाची पाने दिली जात होती.
धान्याने कॅन्सर होईल नष्ट
त्यानंतर नट्स, पांढऱ्या पेठ्याचा ज्यूस, एक ग्लास ज्यूस दिला जात होता. ज्यूस तयार करण्यासाठी बीट, गाजर आणि एक आवळा टाकला जात होता. नंतर सायंकाळी रात्रीचं जेवण, ज्यात भात आणि चपाती नव्हती. त्यात केवळ क्विनोआ देत होते. कारण हेच एक धान्य अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-कॅन्सर आहे. सोबतच नारळाचा वापर करूनही फायदेशीर आहे.
कसं पाणी दिलं?
सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीला असं पाणी दिलं जातं होतं ज्याचं पीएच लेव्हल ७ असावी. कारण आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भाग यापासूनच बनला आहे. त्यामुळे कॅन्सरला हरवण्यासाठी त्यावर लक्ष दिलं पाहिजे.