संक्रमणानंतर ७ महिन्यांपर्यंत रुग्णांमध्ये असतात कोरोनाच्या एंटीबॉडी, तज्ज्ञांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 11:41 AM2020-10-25T11:41:32+5:302020-10-25T11:43:10+5:30

CoronaVirus News & Latest Updates : एंटीबॉडीजमुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढून व्हायरसचा प्रभाव कमी करण्यास मदत होते. 

Antibodies against coronavirus detectable up to seven months post covid-19 onset says study | संक्रमणानंतर ७ महिन्यांपर्यंत रुग्णांमध्ये असतात कोरोनाच्या एंटीबॉडी, तज्ज्ञांचा दावा 

संक्रमणानंतर ७ महिन्यांपर्यंत रुग्णांमध्ये असतात कोरोनाच्या एंटीबॉडी, तज्ज्ञांचा दावा 

Next

कोरोनाच्या संक्रमणाने जगभरात कहर केला आहे. कोरोनाच्या प्रसाराबाबत शास्त्रज्ञांकडून नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान कोरोनाच्या संक्रमण झाल्यानंतर शरीरात तयार होत असलेल्या एंटीबॉडीजबाबत एक सकारात्मक दावा तज्ज्ञांनी केला आहे.  एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोणत्याही व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर आजारांशी लढत असलेल्या एंटीबॉडी पहिल्या तीन महिन्यात वेगाने विकसित होतात. विशेष म्हणजे या आजाराची लागण झाल्यानंतर जवळपास सात महिन्यांपर्यंत रुग्णांच्या शरीरात एंटीबॉडी तशाच राहतात. एंटीबॉडीजमुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढून व्हायरसचा प्रभाव कमी करण्यास मदत होते. 

१९८ निरोगी लोकांवर परिक्षण करण्यात आले होते

कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या  ३०० रुग्ण आणि  १९८ निरोगी लोकांवर हे संशोधन करण्यात आलं होतं. यात असं दिसून आलं की युरोपियन जर्नल ऑफ इम्यूनोजीमध्ये सार्स -कोव-२ व्हायरसचे शिकार झालेल्या लोकांच्या शरीरारत  ६ महिन्यांनंतरही एंटीबॉडी दिसून आल्या होत्या. आनंदाची बातमी! कोरोनाच्या पहिल्या औषधाला FDA कडून मंजुरी, कमी वेळात रुग्ण बरे होणार, तज्ज्ञांचा दावा

पोर्तुगालचे प्रमुख संस्थान आयएमएमचे मार्क वेल्होएन यांच्या नेतृत्वात वैज्ञानिकांनी रुग्णालयातील  ३०० पेक्षा जास्त  कोरोना रुग्ण, आरोग्यसेवेतील कर्मचारी, २५०० युनिव्हर्सिटीतील कर्मचारी आणि  १९८ कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आलेल्या लोकांच्या शरीरातील एंटीबॉडीच्या प्रमाणाचा अभ्यास केला होता. या संशोधनादरम्यान दिसून आलं की जवळपास  ९० टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाशी लढत असलेल्या एंटीबॉडीजचा विकास झाला होता. संक्रमणानंतर जवळपास ७ महिने एंटीबॉडी शरीरात होत्या. ....म्हणून कोरोना संक्रमण झाल्यानंतर केस गळण्याची समस्या उद्भवते, तज्ज्ञांचा खुलासा

रोजच्या वापरातील 'या'  वस्तूंमुळे होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग

फोनची स्क्रिन - फोन आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे. अनेकजण वॉशरूमध्येही मोबाईल घेऊन जातात. अशावेळी कोरोनासारखे असंख्य व्हायरस मोबाईलच्या काचेला चिकटण्याचा धोका असतो. म्हणून वेळोवेळी आपला फोन सॅनिटाईज करत राहायला हवं.

रुग्णालयातील वेटिंग रुम- रुग्णालयातल साफ सफाईकडे विशेष लक्ष दिलं जात. पण अनेक ठिकाणी वेटींग रुममध्ये संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. वेटींग रूममध्ये अनेकांची ये-जा असते. त्यामुळे संक्रमण पसरण्याचा धोका वाढतो. म्हणून कारण नसताना रुग्णालयात जाणं टाळा. गेल्यास मास्क, सॅनिटायजर, फेसशिल्ड, ग्लोव्हजचा वापर करा.

ATM- एटीएमचे बटन, काच यांवर किटाणू सहज चिकटतात. त्यामुळे एटीएमचा वापर टाळून तुम्ही असल्यास तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू शकता. एटीएमचा वापर केला तर लगेचच आपले हात सॅनिटाईज करून घ्या.

घरात कोरोनापासून कसा बचाव कराल- आपल्या घराची साफ सफाई व्यवस्थित करा. सगळ्या भागांना सॅनिटाईज करून घ्या. बाहेरून आल्यानंतर अंघोळ करा, मास्क, कपडे स्वच्छ करून घ्या.

स्टेनलेस स्टील- एका अभ्यासानुसार जास्त तापमानात कोरोना व्हायरस टिकू शकत नाही. स्टेनलेस स्टीलवर हा व्हायरस दीर्घकाळपर्यंत जीवंत राहू शकतो. म्हणून आपल्या किचनमधील स्टीलची भांडी वेळोवेळी स्वच्छ करत राहा.

सार्वजनिक वाहतूकीतील खिडक्या- बस, मेट्रो यांसारख्या सार्वजनिक वाहतुकसेवा अनलॉकमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. या अभ्यासात सार्वजनिक वाहनांच्या खिडक्या संक्रामक असल्याचे सांगण्यात आले आहे. खिडक्या किंवा खांब हे काचेपासून तयार होतात. काचेवर व्हायरस सहज दीर्घकाळ चिकटून राहून शकतो. चढता उतरताना किंवा प्रवासादरम्यान प्रवासी या भागांच्या संपर्कात येतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढू शकतो. म्हणून सार्वजनिक वाहनांचा वापर करताना इतरत्र स्पर्श करू नका. शक्य असल्यास ग्लोव्हजचा वापर करा.

नोटा- एका अभ्यासानुसार कोरोना व्हायरस २० डिग्री तापमानात जवळपास २८ दिवसांपर्यंत जीवंत राहू शकतो. नोटेची देवाण घेवाण करत असताना संक्रमण पसरण्याचा धोका असतो. म्हणून जास्तीत जास्त ऑनलाईन पैश्यांचे व्यवहार करण्याची सवय लावून घ्या.

Web Title: Antibodies against coronavirus detectable up to seven months post covid-19 onset says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.