Lemon With Camphor benefits : लिंबू आणि कापराचं मिश्रण आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत करतं. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे वायरल ते फंगल इन्फेक्शनपासून बचाव करतं. तर कापरामधील तत्वांमुळे वेदना, सूज या समस्या दूर करतात. अशात या दोन्ही गोष्टींच्या मिश्रणाचे आरोग्याला काय काय फायदे मिळतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दाताचं दुखणं होईल दूर
लिंबू आणि कापूर एकत्र करून लावल्याने दात दुखण्याची समस्या दूर करता येते. तसेच याने दातांना किडही लागत नाही. यासाठी लिंबाच्या रसात चिमूटभर कापूर टाकून दातांवर लावा. त्यानंतर पाण्याने गुपळा करा.
पोटासंबंधी समस्या
लिंबू आणि कापराचं मिश्रण लावल्याने पोटासंबंधी समस्या दूर केल्या जाऊ शकतात. याने पोटदुखी, अपचन यांसारख्या समस्या कमी केल्या जाऊ शकतात. याचा वापर करण्यासाठी लिंबाच्या रसात कापूर, ओवा आणि पदीन्याचा रस पाण्यात टाकून सेवन करा. याने फायदा मिळेल.
पायांची स्वच्छता
पायांची टॅनिंग दूर करण्यासाठी लिंबू आणि कापराचं मिश्रण फायदेशीर ठरतं. यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात लिंबाचा रस आणि कापूर टाकून या पाण्यात काही वेळ पाय टाकून बसा. नंतर साध्या पाण्याने पाय धुवावे. काही वेळ हा उपाय केल्याने पायांवरील टॅनिंग, पायांवरील मळ, माती दूर होईल.
केसगळती थांबेल
लिंबू आणि कापराचं मिश्रण केसांवर लावल्याने कोंड्याची समस्या दूर करता येते. यात अॅंटी-डॅंड्रफ आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे डोक्याच्या त्वचेलाही इन्फेक्शन होणार नाही. तसेच केसगळतीची समस्याही दूर होईल.
वजन होईल कमी
शरीराचं वाढलेलं वजन वजन कमी करण्यासाठी लिंबाचा रस आणि कापराचं वापर करू शकता. याने तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होईल, ज्यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्याचा वेग वाढेल. याचा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.