Bael Patra eating benefits : बेलाच्या पानांचं मोठं धार्मिक महत्व आहे. त्यासोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पण ते फार जास्त कुणाला माहीत नसतात. बेलाच्या पानांमध्ये कॅल्शिअम, फायबरसोबतच व्हिटॅमिन ए, सी, बी1 आणि बी6 सारखे पोषक तत्व असतात. अशात ही पाने रोज खाल्ली तर अनेक समस्या दूर होतात. चला जाणून घेऊ बेलाची पाने खाण्याचे फायदे...
तशी तर तुम्ही बेलाची पाने कधीही खाऊ शकता. पण एक्सपर्ट या पानांचं सेवन सकाळी रिकाम्या पोटी करण्याचा सल्ला देतात. कारण सकाळी याचे बरेच फायदे मिळतात. कारण सकाळी तोंड धुण्याआधी शरीर पोषक तत्व सहजपणे अवशोषित करतं.
बेलाची पाने खाण्याचे फायदे
1) बेलाच्या पानांना आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. जर तुम्हाला पोटासंबंधी काही समस्या असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी बेलाची काही पाने खावीत.
2) रोज सकाळी बेलाच्या पानांचं सेवन केल्याने गॅस, अॅसिडिटी आणि अपचन अशा समस्या दूर होतात.
3) तसेच ज्या लोकांना पाइल्सची समस्या आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही पाने खाणं फायदेशीर ठरू शकतं.
हृदयासाठी फायदेशीर
जर तुम्ही रोज सकाळी बेलाच्या पानांचं सेवन कराल तर यात असलेले अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व तुम्हाला हृदयरोगापासून वाचवू शकतात. सोबतच हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशरचा धोकाही कमी होतो.
शरीर थंड राहतं
बेलाची पाने ही थंड असतात. अशात जर तुम्ही रोज यांचं सेवन कराल तर शरीर दिवसभर थंड राहतं. खासकरून उन्हाळ्यात बेलाच्या पानांचं सेवन अधिक फायदेशीर ठरतं. याने तुम्हाला थंडावा मिळेल.
तोडांतील फोड होतील दूर
उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेमुळे तोंडात फोड होतात. अशात जर तुम्ही बेलाची पाने चावून खाल तर याने फायदा मिळेल.
डायबिटीसमध्ये आराम
जर तुम्हाला डायबिटीस झाला असेल तर तुम्ही रोज सकाळी बेलाची पाने खायला हवीत. या पानांमधील फायबर आणि इतर पोषक तत्व डायबिटीसच्या रूग्णांसाठी गरजेचे असतात. रिकाम्या पोटी ही पाने खाल्लीत तर ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.