दिलासादायक! भारतात २०२१ च्या सुरुवातीला लस येणार; ४४० रुपयांना उपलब्ध होणार, तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 04:22 PM2020-08-28T16:22:20+5:302020-08-28T16:32:32+5:30
बर्नस्टीनच्या रिपोर्टनुसार जागतिक स्तरावर चार उमेदवार असे आहेत. जे २०२० च्या शेवटापर्यंत किंवा २०२१ च्या सुरूवातीला लसीचं अप्रुव्हल घेऊ शकतात.
कोरोना व्हायरसच्या महासंकटाचा सामना भारतासह जगभरातील अनेक देश करत आहेत. भारतात कोरोनाची लस २०२१ च्या सुरूवातील येईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पुण्यातील मोठी लस निर्मीती करणारी कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीया आपली पहिली लस विकसित करण्याच्या प्रयत्नात असेल. ही माहिती स्ट्रीट रिसर्च आणि ब्रोकरेज फर्म, बर्नस्टीन रिसर्चने गुरुवारी रिपोर्टमध्ये दिली आहे. बर्नस्टीनच्या रिपोर्टनुसार जागतिक स्तरावर चार उमेदवार असे आहेत. जे २०२० च्या शेवटापर्यंत किंवा २०२१ च्या सुरूवातीला लसीचं अप्रुव्हल घेऊ शकतात.
वैज्ञानिक भागिदारीच्या माध्यामातून भारत २ लसी तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. या एजेड/ऑक्सफोर्ड वेक्टर लस आणि नोवावॅक्स प्रोटीन सब युनिट लसी आहेत. एसआईआईला आपली क्षमता आणि योग्यतेच्या आधारावर अप्रुव्हलची वेळ, क्षमता आणि मुल्य निर्धारण लक्षात घेऊन व्यावसाईकरणासाठी या २ लसींना प्राध्यान्य देण्यात आलं आहे. या दोन लसीच्या चाचण्यांमधून दिलासादायक रिपोर्ट समोर आले आहेत. भारतात लस विकसीत झाल्यानंतर संपूर्ण जगासाठी लस तयार करण्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
याशिवाय उत्पादन आणि वितरण यांसारख्या आवाहानांना तोंड देण्यासाठीही तयार असल्याचे तज्ज्ञ म्हणाले. रिपोर्टनुसार सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीया २०२१ मध्ये ६०कोटी डोस आणि २०२२ मध्ये १०० कोटी डोस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. सरकारी आणि खासगी बाजारात लसीचं प्रमाण ५५:४५ असं असेल. एसआईआई, भारत बायोटेक, बायोलॉजिकल ई अन्य काही लहान कंपन्या मिळून दरवर्षी मोठ्या संख्येनं लसीचे उत्पादन करतात. कोरोनाची लस तयार करण्याासाठी एसआईआईनं गावी द वॅक्सिन अलायंस आणि बिल एंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनसह भागिदारी केली आहे.
बर्नस्टीनच्या रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलेल्या माहितीनुसार सरकारसाठी प्रति डोस खरेदी मुल्य तीन डॉलर आणि ग्राहकांसाठी सहा डॉलर असणार आहे. याशिवाय ज्या फार्मा कंपनीज आपल्या लसीवर काम करत आहेत. अशा तीन कंपन्यांबाबत माहिती दिली आहे. एसआयआयला या भागिदारीतून उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मदत मिळाली आहे. दोन्ही लसीचें रेग्युलेटरी अप्रुव्हल मिळाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रिक्वालिफिकेशन प्राप्त होऊ शकेल. भारत आणि कमी, मध्यम लोकसंख्याा असलेल्या देशांना २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यात लस उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जाणार आहे. असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ७५,७६० रुग्ण आढळून आले. जगभरातील कोणत्याही देशात एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आजवर आढळले नव्हते. त्यामुळे तो विक्रमही आता भारताच्या नावावर जमा झाला आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांचे देशातील प्रमाण आता ७६.२४ टक्के झाले असून, त्यांची संख्या २५ लाखांवर पोहोचली आहे.
देशभरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३३,१०,३२४ झाली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी आणखी १,०२३ जण मरण पावल्याने कोरोना बळींचा एकूण आकडा ६०,४७२ झाला आहे. या आजारातून २५,२३,७७१ जण पूर्णपणे बरे झाले
आहेत.
हे पण वाचा-
लढ्याला यश! भारतात कोरोनाची 2 सर्वात स्वस्त औषधं आली; एक टॅब्लेट 55 रुपयांना
युद्ध जिंकणार! रशियाकडून कोरोना लसीबाबत गुड न्यूज; लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू होणार?