Mosquitoes Prevention Remedies: जसजशी गरमी वाढत जाते डासांचा त्रास वाढत जातो. कारण हे त्यांच्या वाढण्यासाठी पोषक वातावरण असतं. या दिवसात डास खूप जास्त हैराण करतात आणि त्यामुळे झोपेचं खोबरं होतं. सोबतच अनेक आजारांचा धोकाही वाढतो. अशात डास पळवून लावण्यासाठी अनेकदा कॉईल, लिक्विडचा वापर केला जातो. पण याने फारसा फरक बघायला मिळत नाही. त्यामुळे आम्ही डास पळवून लावण्याचे काही बेस्ट घरगुती उपाय सांगणार आहोत.
कापरा धूर
जर तुम्हालाही डासांच्या त्रासापासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही कापराचा वापर करू शकता. 2 ते 3 कापराच्या वड्या जाळून रूममध्ये ठेवा. यानंतर रूम थोडावेळ बंद ठेवा. जेव्हा कापूर पूर्णपणे जळेल तेव्हा रूमचा दरवाजा उघडा. कापराच्या सुगंधाने डास तुमच्या रूममधून बाहेर पडतील.
कडूलिंबाच्या पानांचा धूर
कडूलिंब हा एक चांगला आयुर्वेदिक उपाय मानला जातो. जर तुमच्या घरात डासांनी हल्ला केला असेल तर तुम्ही कडूलिंबाच्या हिरव्या पानांचा धूर करू शकता. ही पाने जळू नये त्यांना थोडं पेटवून धूर करा. त्यातून केवळ धूर निघावा. बघता बघता घरातील सगळे डास काही वेळात बाहेर पडतील.
लसणाची पेस्ट
लसणाचा सुगंध जरा उग्र असतो. त्यामुळे हा सुगंध डास सहन करू शकत नाहीत. सामान्यपणे जिथे लसूण ठेवलेलं असतं तिथे डास येत नाहीत. जर तुमच्या घरात जास्त डास झाले असतील तर लसणाची पेस्ट तयार करा. रूममधील काही कोपऱ्यात ती ठेवा. डास लगेच पळतील.
पदीन्याचा रस
तसा तर पुदीन्याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यासोबतच पुदीन्याचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठीही केला जातो. याच पुदीन्याचं रोप तुम्ही घरात लावल्यास डासांपासून सुटका मिळवू शकता.
ही पद्धतही बेस्ट
डास घरातून पळवून लावण्यासाठी कडूलिंबाची पाने, तेजपत्ता, काही लवंग आणि कापूर मिक्स करून त्याचा धूर करा. यानेही डासांपासून तुम्हाला सुटका मिळेल.
हे घरगुती उपाय काही दिवस केले तर डास तुमच्या घराच्या आसपासही येणार नाहीत. तुम्हाला चांगली झोप लागले आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील.