Blood Cancer Symptoms : 'ही' समस्या असू शकते ब्लड कॅन्सरचं लक्षण, वेळीच डॉक्टरांना करा संपर्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 02:16 PM2022-02-18T14:16:53+5:302022-02-18T14:17:05+5:30

Blood Cancer Symptoms : ल्यूकेमियाला ब्लड कॅन्सर म्हटलं जातं. या आजाराने शरीरात पांढऱ्या रक्त पेशी वेगाने वाढू लागतात. जर वेळेवर यावर उपचार केले गेले नाही तर हा आजार जास्त घातक बनतो.

Blood Cancer Symptoms : Pain in bones can be a symptom of blood cancer | Blood Cancer Symptoms : 'ही' समस्या असू शकते ब्लड कॅन्सरचं लक्षण, वेळीच डॉक्टरांना करा संपर्क!

Blood Cancer Symptoms : 'ही' समस्या असू शकते ब्लड कॅन्सरचं लक्षण, वेळीच डॉक्टरांना करा संपर्क!

googlenewsNext

जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा जीव कॅन्सरमुळे जातो. कॅन्सर हा आजार वेगवेगळ्या प्रकारचा असतो. यातील ब्लड कॅन्सर (Blood Cancer) हा मृत्यूचं मोठं कारण आहे. शरीरात रक्त कमी झाल्याने ल्यूकेमिया होतो. ल्यूकेमियाला ब्लड कॅन्सर म्हटलं जातं. या आजाराने शरीरात पांढऱ्या रक्त पेशी वेगाने वाढू (Blood Cancer Symptoms) लागतात. जर वेळेवर यावर उपचार केले गेले नाही तर हा आजार जास्त घातक बनतो.

डॉक्टर सांगतात की, ब्लड कॅन्सर हा आजार इतर अनेक आजारांप्रमाणे जेनेटिक नाहीये. चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याकडे लक्ष न देणे, प्रदूषण आणि इतर काही कारणांनीही हा आजार होतो. बोनमॅरो ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून ब्लड कॅन्सरचा रूग्ण बरा होऊ शकतो.

कॅन्सर एक्सपर्ट डॉ. विनीत कुमार यांनी 'टीव्ही ९'ला सांगितलं की, जेव्हा पांढऱ्या रक्त कोशिका वाढतात तेव्हा डीएनए डॅमेज होतो. याने ल्यूकेमिया होतो. या कॅन्सरच्या सेल बोनमॅरोमध्ये वाढतात. यात राहूनच रक्त कोशिकांना सामान्य रूपाने वाढण्यास आणि योग्य काम करण्यापासून रोखतात. त्यामुळेच ब्लड कॅन्सरला बोनमॅरोचा कॅन्सर असंही म्हटलं जातं. याची टेस्ट फ्लो सायटोमेट्री टेक्निकने केली जाते. टेस्टमध्ये कॅन्सरचं निदान झालं तर रूग्णाच्या स्टेजच्या हिशोबाने त्यांच्यावर उपचार केले जातात. सुरूवातीला कीमोथेरपी आणि रेडिओथेरपी होते. गंभीर स्थितीत बोनमॅरो ट्रान्सप्लांट केलं जातं.

डॉक्टरांनुसार, जर कॅन्सरचं निदान लवकर झालं तर रूग्णाला सहजपणे वाचवता येतं. पण लोकांना कॅन्सरबाबत यांच्या लक्षणांबाबत कमी माहिती असते. हेच कारण आहे की, जास्तीत जास्त रूग्ण शेवटच्या स्टेपमध्ये उपचारासाठी पोहोचतात.

काय असतात लक्षणं?

ब्लड कॅन्सरची वेगवेगळी लक्षणं आहेत. त्यात पुन्हा पुन्हा ताप येणे, शरीराच्या एखाद्या भागात गाठ असणे, अचानक वजन कमी होणे, कमजोरी, रक्त कमी होणे, रात्री झोपेत अचानक घाम येणे, सांधे आणि हाडांमध्ये वेदना होणे, सूज येणे यांचा लक्षणांमध्ये समावेश आहे. या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका. असं काही जाणवलं तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा.

तसेच  ब्लड कॅन्सरच्या सुरूवातीला मायग्रेनची समस्याही काही लोकांमध्ये दिसते. त्यासोबतच अचानक उलट्या होणे किंवा जुलाब लागणे, त्वचेवर खाज येणे, त्वचेवर चट्टे येणे, जबड्यात सूज येणे ही सुद्धा काही लक्षणं आहेत.
 

Web Title: Blood Cancer Symptoms : Pain in bones can be a symptom of blood cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.