Breast cancer awareness : आहारामध्ये 'या' 6 पदार्थांचा समावेश करा; स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 03:22 PM2018-10-08T15:22:45+5:302018-10-08T15:28:30+5:30

ब्रेस्ट कॅन्सर हा अत्यंत गंभीर आजार असून अलिकडे त्याचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशन (WHO)च्या म्हणण्यानुसार, 2020पर्यंत जगभरामध्ये सर्वात जास्त रूग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे असतील.

breast cancer awareness these food can prevent the risk of breast cancer | Breast cancer awareness : आहारामध्ये 'या' 6 पदार्थांचा समावेश करा; स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळा!

Breast cancer awareness : आहारामध्ये 'या' 6 पदार्थांचा समावेश करा; स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळा!

Next

ब्रेस्ट कॅन्सर हा अत्यंत गंभीर आजार असून अलिकडे त्याचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशन (WHO)च्या म्हणण्यानुसार, 2020पर्यंत जगभरामध्ये सर्वात जास्त रूग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे असतील. त्याचप्रमाणे इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, येणाऱ्या 20 वर्षांमध्ये अधिकाधिक महिला स्तनाच्या कर्करोगाने पीडित असतील. 

हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, कॅन्सर होण्याची अनेक कारणं असतात. परंतु आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीही अनेकदा कर्करोग होण्यासाठी जबाबदार असतात. त्यामुळे आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा, ज्यांमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. जर तुम्ही स्तनाच्या कर्करोगापासून बचाव करायचा असेल तर आपल्या डाएटमध्ये या पदार्थांचा नक्की समावेश करा. 

ग्रीन टी - 

वजन कमी करण्यापासून ते ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर ठरते. ग्रीन टीमध्ये मुबलक प्रमाणात पॉलीफेनॉल अॅन्टीऑक्सीडंट्स अस्तित्वात असतात. हे अॅन्टीऑक्सिडंट फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या डीएनए डॅमेजपासून पेशींना सुरक्षित ठेवतात. यावर अद्याप रिसर्च सुरू आहे. परंतु, दररोज ग्रीन टीचं सेवन केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो.

डाळिंब - 

स्तनाच्या कर्करोग रोखण्यासाठी डाळिंबाचं सेवन फायदेशीर ठरतं. डाळिंबामध्ये असलेलं पॉलीफेनॉल कर्करोगाच्या पेशींना वाढण्यापासून थांबवतं. 2009मध्ये करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, डाळिंबाच्या ज्युसमध्ये स्तनाचा कर्करोगापासून बचाव करण्याचे गुणधर्म असतात. अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की, स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी किती प्रमाणात डाळिंब खाणं योग्य असतं. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर डाळिंब खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

हळद -

प्रत्येक भारतीय घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या हळदीमध्ये अनेक गुणधर्म आढळून येतात. हळदीमध्ये कर्करोगाशी लढण्यासाठी आवश्यक असणारे करक्यूमिन आढळून येतं. हे तत्त्व स्तनाच्या कर्करोगासोबतच त्वचेच्या कर्करोगावरही परिणामकारक ठरतं. जर कर्करोगापासून बचाव करायचा असेल तर दररोज एक चिमूटभर हळद खाणं फायेदशीर ठरतं. 

लसूण -

लसणामध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करणारे एलियम कंपाउंड आढळून येतं. लसणाशिवाय कांदाही कर्करोगावर फायदेशीर ठरतो. 2007मध्ये झालेल्या एका संशोधनामध्ये संशोधकांनी स्तनाच्या कर्करोगावर लसणामुळे होणाऱ्या फायद्यांची तपासणी केली होती. त्यामध्ये लसणामुळे कर्करोगावर होणारे परिणाम दिसून आले. 

अळशी - 

अळशीमध्ये ओमेगा-3, लिगनन्स आणि फायबर अस्तित्वात असतं. हे सर्व घटक स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास रोखतात. 

ब्रोकली -

ब्रोकलीमध्ये मोठ्या प्रमाणात सल्फोराफेन आणि इंडोल्स अस्तित्वात आहे. हे तत्व स्तनाच्या कर्करोगासोबतच इतर कर्करोगांवरही फायदेशीर ठरते. 

Web Title: breast cancer awareness these food can prevent the risk of breast cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.