दिवसातून 2 वेळा ब्रश केल्यास कोरोना संसर्गापासून होऊ शकतो बचाव; ब्रिटिश तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 06:29 PM2020-10-25T18:29:16+5:302020-10-25T18:30:23+5:30

CoronaVirus News & latest Updates : ब्रिस्टल युनिव्हर्सिटीतील डेंटिस्ट्री प्राध्यापक मार्टीन एडी यांनी हात धुण्याप्रमाणेच ब्रश करण्याची सवय महत्वाची असल्याचा दावा केला आहे.

Brush in the teeth twice a day is necessary to prevent corona virus british dentist | दिवसातून 2 वेळा ब्रश केल्यास कोरोना संसर्गापासून होऊ शकतो बचाव; ब्रिटिश तज्ज्ञांचा दावा

दिवसातून 2 वेळा ब्रश केल्यास कोरोना संसर्गापासून होऊ शकतो बचाव; ब्रिटिश तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी फेस मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायजर मास्कचा वापर केला जात आहे. कारण कोरोनाला रोखण्यासाठी आतापर्यंत कोणतीही लस  उपलब्ध झालेली नाही. एका डेंटिस्टने या सर्व उपायांबरोबरच  दास घासल्याने कोरोनापासून बचाव होऊ शकतो असा दावा केला आहे. ब्रिस्टल युनिव्हर्सिटीतील डेंटिस्ट्री प्राध्यापक मार्टीन एडी यांनी हात धुण्याप्रमाणेच ब्रश करण्याची सवय महत्वाची असल्याचा दावा केला आहे. 

ब्रिटनचे वृत्तपत्र द टेलीग्राफमध्ये  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार टुथपेस्टमध्ये तेच पदार्थ असतात जे हात धुण्याच्या साबणात असतात. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार तोंडापासूनच  रोखण्यास मदत मिळते. टेलिग्राफमधील या माहितीच्या हवाल्याने  मिररच्या एका रिपोर्टमध्ये प्राध्यापकांनी सांगितले की, टूथपेस्ट वापरून ब्रश केल्यानंतर रोगाणूरोधी क्रिया तीन ते पाच तासांपर्यंत राहते. यामुळे तोंडात व्हायरसने प्रवेश केल्यानंतर लाळेत इन्फेक्शन कमी प्रमाणात तयार होतं. 

पुढे त्यांनी सांगितले की, त्यासाठी लोकांनी बाहेर जाण्याआधी दात चांगले स्वच्छ करायला हवेत. तसंच लोकांनी दात घासण्याचे प्रमाण वाढवायला हवे.  जर कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी जायचं असेल तर आधी दात नीट स्वच्छ करून जायला हवं. तसंच  दात घासण्याच्या वेळेकडेही लक्ष द्यायला हवे. दात घासण्याच्या सवयीबाबत ब्रिटिश प्राध्यापक नेहमीच गांभिर्याने विचार करतात. यावर्षी एप्रिलमध्ये त्यांनी ब्रिटिश डेंटल जर्नलमध्ये एक पत्र लिहिले होते. या पत्रात डेंटिस्ट समुहावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यात नमुद करण्यात आलं होतं की, कोरोना व्हायरसचा संसर्ग, प्रसार कमी होण्यासाठी टूथब्रशिंगने स्वच्छता वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं नाही. पॉझिटिव्ह बातमी! कोरोनामुळे नष्ट होतोय 'हा' जीवघेणा आजार; रुग्णांमध्ये मोठी घट, तज्ज्ञांचा दावा

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनापासून बचावासाठी सतत हात धुण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे प्रोफेसर एडी यांनी सांगितले की, दिवसातून दोनवेळा दात घासायलाच हवेत.  तसंच दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारला, माध्यमांना आवाहन करायला हवं. मौखिक स्वच्छतेला प्राध्यान्य द्यायला हवं. ज्या लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त आहे. त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. आतापर्यंत दात घासण्याच्या सवयींवर कोणतेही संशोधन करण्यात आलेले नाही. पण स्वच्छतेसाठी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियमित दोनवेळा दात घासण्याला प्राध्यान्य द्यायला हवे. असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट येणार?; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ३ राज्यात कोरोनाचा कहर

कोरोना संक्रमण झाल्यानंतर केस गळण्याची समस्या...

या अभ्यासासाठी अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक, डॉक्टर नताली यांच्या टीमने जवळपास १५०० लोकांवर सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या दीर्घकाळ कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला होता. कोरोनातून  रिकव्हर झाल्यानंतरही अनेकांना केस गळण्याची समस्या उद्भवली होती.

संशोधकांना दिसून आलं की, केस गळणं हे कोरोनाच्या  २५ लक्षणांपैकी एक आहे. सर्वेक्षणात सहभाग असलेल्या लोकांनी सर्दी, उलट्या होणं यासह केस गळण्याच्या समस्येचा सामना केला. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार  या व्हायरसचं संक्रमण आणि केस गळणं यामधील सगळ्यात महत्वाचे कारण ताण तणाव आहे. कोणत्याही आजाराचा जास्त ताण घेतल्याने केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. 

या स्थितीला टेलोजेन एफ्लूवियम असंही म्हणतात टेलोजेन एफ्लूवियम या प्रकारत कोणताही आजार, मानसिक धक्का यांमुळे जास्त ताण तणाव येऊन केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त संक्रमणादरम्यान शरीरात पोषक तत्वांची कमतरतता आढळून येते. त्यामुळे केस गळतात. दरम्यान कोरोना व्हायरस आणि केस गळणं यातील संबंधाबाबत अधिक चर्चा  सुरू आहे. 

Web Title: Brush in the teeth twice a day is necessary to prevent corona virus british dentist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.