Brushing Tips: रोज दात घासूनही पिवळेच दिसतात? मग वेळीच जाणून घ्या योग्य पद्धत, दुर्गंधीसुद्धा होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 11:09 AM2021-02-01T11:09:52+5:302021-02-01T11:20:47+5:30

Brushing Tips in Marathi : अनेकदा ब्रशिंगशी निगडीत काही चुकांमुळे ब्रश करूनही तुमचे दात पिवळे दिसून येतात.

Brushing Tips: What is the right way to brush your teeth how many minutes of brushing is sufficient | Brushing Tips: रोज दात घासूनही पिवळेच दिसतात? मग वेळीच जाणून घ्या योग्य पद्धत, दुर्गंधीसुद्धा होईल दूर

Brushing Tips: रोज दात घासूनही पिवळेच दिसतात? मग वेळीच जाणून घ्या योग्य पद्धत, दुर्गंधीसुद्धा होईल दूर

googlenewsNext

ओरल हेल्थ म्हणजेच आपलं तोंड स्वच्छ करणं आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण तोंड व्यवस्थित साफ न करणं  हृदयरोगासारख्या गंभीर आजाराचं कारण ठरू शकतं. सगळेचजण सकाळी उठल्यानंतर काहीही खाण्याआधी ब्रश करतात. दातांना जास्तीत जास्तवेळ घासतात तरीही काहीही खाल्यानंतर किंवा चहा प्यायल्यानंतर त्यांच्या दातांमध्ये पिवळटपणा आलेला दिसून येतो. अनेकदा ब्रशिंगशी निगडीत काही चुकांमुळे ब्रश करूनही तुमचे दात पिवळे दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला नियमित दात घासताना कोणती काळजी  घ्यायला हवी याबाबत सांगणार आहोत.   

ब्रश करण्याचे फायदे

योग्यप्रकारे ब्रश केल्यानं दातांमध्ये प्लाकची समस्या उद्भवत नाही.

दातांमध्ये(Cavity) कॅव्हिटीज होण्यापासून रोखता येऊ शकतं. 

हिरड्यांशी संबंधित(Gum Disease)  समस्यांचा धोका टळतो. 

ओरल कॅन्सरची जोखिम कमी होते. 

रोज किती वेळ ब्रश करायला हवा?

अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या मते, प्रत्येक व्यक्तीने दिवसातून २ वेळा ब्रश केला पाहिजे आणि प्रत्येक वेळी 2 मिनिटांपेक्षा जास्त दात स्वच्छ करू नये. जर आपण २ मिनिटांपेक्षा कमी वेळ दिला तर आपण दातांमध्ये जमा झालेले प्लाक काढून टाकण्यास अडचण निर्माण होऊ शकते नाही. २००९ च्या भ्यासानुसार, बहुतेक लोक ब्रश करण्यास फक्त ४५ सेकंद घेतात. असे बरेच लोक आहेत जे ब्रश करण्यास बराच वेळ घेतात कारण ते दात बराच वेळ घासतात. दात घासण्यासाठी लागणारा वेळ याचा दातांच्या इनॅमलवर परिणाम होत असतो. 

टूथब्रश कसा असावा?

दात स्वच्छ करण्यासाठी सॉफ्ट ब्रिसल्सच्या टुथब्रशचा वापर करायला हवा. कठीण  ब्रिसल्सच्या ब्रशमुळे दाताचे इनॅमल खराब होण्याची शक्यता असते. म्हणून जर ब्रशचे ब्रिसल्स खराब झाले असतील तर त्वरित बदलून घ्या. 

टूथपेस्ट कशी असावी?

तुम्ही अशी टुथपेस्ट वापरायला हवी ज्यात फ्लोराईडचे  योग्य प्रमाण असेल. वयस्कर लोकांच्या टुथपेस्टमध्ये  १३५० पीपीएम फ्लोराईड असते तर ६ वर्षांपेक्षा लहान वयोगटातील मुलांच्या टुथपेस्टमध्ये १००० पीपीएम फ्लोराईड असायला हवं. ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांनी खूप कमी प्रमाणात टुथपेस्टचा वापर करायला हवा. साधारणपणे एका पाण्याच्या एका थेंबाइतकंच टुथपेस्टचं प्रमाण असावं. कोरोना व्हायरसमुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम?; नवीन संशोधनातून खुलासा

ब्रश करण्याची योग्य वेळ?

डेंटिस्ट नेहमीच काहीही खाल्यानंतर ब्रश करण्याचा सल्ला देतात. पण सकाळी उठल्यानंतर आणि  झोपण्याआधी एकदा दात स्वच्छ करणं गरजेचं आहे. याव्यतिरिक्त कोणत्याप्रकारचे पेय घेतल्यानंतर  लगेच दात स्वच्छ करू नका कारण कारण त्यामुळे दातांचे इनॅमल कमजोर होतात आणि ब्रश केल्यानंतर निघून जातात. सकाळी उठल्यानंतर 'हे' छोटंसं काम करा अन् आरोग्याच्या तक्रारींसाठी सतत दवाखान्यात जाणं टाळा

माऊथवॉश  वापरायला हवा का?

जर आपण फ्लोराईड असलेले माउथवॉश वापरत असाल तर आपण दात किडण्याची समस्या कमी होऊ शकते. परंतु ब्रश केल्यावर लगेच माउथवॉश वापरू नका, कारण टूथपेस्ट वापरल्यानंतर दातांवर जमा होणारे फ्लोराईड माउथवॉश धुवून टाकेल. म्हणून माउथवॉशसाठी वेगळी वेळ निवडा. 

Web Title: Brushing Tips: What is the right way to brush your teeth how many minutes of brushing is sufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.