(Image Credit-The conversation)
चीनमध्ये कोरोना व्हायरसची एक्सप्रिमेंटल लस सुरक्षित आणि प्रभावी ठरली आहे. ही लस चायनीज अॅकडेमी ऑफ मेडिकल सायंसेजच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल बायोलॉजीकडून विकसित करण्यात आली आहे. क्लिनिकल ट्रायलच्या सुरूवातीच्या टप्प्यात ही लस सुरक्षित आणि प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार १९१ स्वयंसेवकांवर पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल करण्यात आलं होतं. सगळ्या वॉलेंटिअर्सचं वय १८ ते ५९ वर्ष या दरम्यान होते.
मंगळवारी वैज्ञांनिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणत्याही गटातील स्वयंसेवकांवर साईट इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. लस दिल्यानंतर हलकी लक्षणं स्वयंसेवकांमध्ये दिसून आली होती. लस दिल्यानंतर स्वयंसेवकांना इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी सौम्य वेदना, थकवा, खाज, सूज अशा समस्या जाणवल्या तर रोगप्रतिकारकशक्तीवर चांगला परिणाम दिसून आल्याचे सांगितले जात आहे.
या चाचणीतील परिक्षण डेटावरून लस प्रभावशाली, सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. चीनसह अजूनही काही लसी शर्यतीत पुढे आहेत. त्यात कॅनसिनो बायोलॉजिकल, सिनोवॅक आणि बीजिंग इंस्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकलद्वारे विकसित करण्यात आलेल्या लसीचा समावेश आहे. दरम्यान या लसीची चाचणी पूर्ण होण्याआधीच आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या लोकांना, गंभीर स्वरुपात आजारी असलेल्या लोकांना लस देण्याची मोहिम चीनमध्ये सुरू झाली होती. या लसीच्या सुरक्षिततेबाबत वैज्ञानिकांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या चीनी कंपनीच्या चार लसी या क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत.
पुढच्यावर्षी मार्चमध्ये येणार कोरोनाची लस येणार का?
अनेक देशांतील लसी या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यातील पोहोचल्या आहेत. भारतात 3 पैकी 2 लसी पुढच्यावर्षी मार्चपर्यंत लॉन्च होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढच्या वर्षापर्यंत कोरोनाची लस मिळण्याची अपेक्षा सरकारला आहे. गुरूवारी केंद्र सरकारचे काही मंत्री आणि लस तयार करत असलेल्या कंपन्यांमध्ये बैठक झाली होती.
या बैठकीत कोरोना व्हायरसची लस मार्चपर्यंत लॉन्च होऊ शकते असे संकेत मिळाले होते. पण तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवर लस कधी येणार हे अवलंबून असेल. सरकारी सुत्र ईटी यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत लसीची वेळोमर्यादा, रेग्युलेटरी संस्थानांची मंजूरी प्रक्रिया, लसीची उपलब्धता, वितरण आणि अन्य काही मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती. आयुर्वेदिक काढा प्यायल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो?; आयुष मंत्रालयाने दिलं उत्तर
या बैठकीत लस तयार करत असलेली कंपनी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडीया आणि झायडस कँडिलाचे वरिष्ठ अधिकारी नीती आयोगाचे सदस्य विनोद पॉल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सामिल झाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचे सचिव, आरोग्य विभाग, आयसीएमआर आणि फार्मास्युटीकल्सने १ ऑक्टोबरला झालेल्या या बैठकीत सहभाग घेतला होता. सर्वकाही व्यवस्थित असल्यास साधारण मार्च महिन्यापर्यंत कोरोनाची लस लॉन्च केली जाऊ शकते असे स्पष्ट करण्यात आले. दिलासादायक! कोरोना लसीबाबत WHO च्या प्रमुखांची मोठी घोषणा; तज्ज्ञ म्हणाले की.....