Colon Cancer Symptoms : काय असतात कोलोन कॅन्सरची लक्षणं? दुर्लक्ष केलं तर पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 12:27 PM2022-02-19T12:27:47+5:302022-02-19T12:30:47+5:30

Colon Cancer Symptoms: पोट खराब झाल्यावरही अनेक लोकांना मल त्याग करण्यात अडचण येते. पण त्यासोबत रक्त येणं आणि वेदना होणं एखाद्या गंभीर आजाराचं जसे की, कोलोना कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

Colon Cancer Symptoms : Warning signs and symptoms of colon cancer in stool | Colon Cancer Symptoms : काय असतात कोलोन कॅन्सरची लक्षणं? दुर्लक्ष केलं तर पडेल महागात!

Colon Cancer Symptoms : काय असतात कोलोन कॅन्सरची लक्षणं? दुर्लक्ष केलं तर पडेल महागात!

googlenewsNext

Colon Cancer Symptoms: जगभरात कॅन्सर या जीवघेण्या आजारामुळे दरवर्षी लाखो लोकांचा जीव जातो. कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यातीलच एक प्रकार म्हणजे कोलोन कॅन्सर यालाच रेक्टल कॅन्सर असंही म्हणतात. तुम्हाला जर काही दिवसांपासून मल त्याग करताना कोणत्या प्रकारची समस्या होत असेल, मल त्याग करताना रक्त येत असेल किंवा वेदना होत असेल तर या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. पोट खराब झाल्यावरही अनेक लोकांना मल त्याग करण्यात अडचण येते. पण त्यासोबत रक्त येणं आणि वेदना होणं एखाद्या गंभीर आजाराचं जसे की, कोलोना कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

अनेकदा पाइल्स किंवा मलद्वाराजवळील ब्लड वेसल्समध्ये सूज आल्यानेही मल त्याग करण्यात मोठी अडचण होते. कोलोन कॅन्सरला कोलेरेक्टल कॅन्सरही म्हटलं जातं. जो मोठ्या आतडीत किंवा रेक्टममध्ये होतो. मल त्याग करताना कोणत्याही समस्या होत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. कोलेरेक्टल कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं लगेच ओळखून त्यावर उपचार सुरू केले जावे. वेळीच उपचार घेतले तर रूग्ण बरेही होतात.

कोलोन कॅन्सरची लक्षणं

एका हेल्थ वेबसाइटनुसार,  कोलोन कॅन्सर झाल्यावर अचानक वजन कमी होऊ लागतं. मल त्याग करताना ब्लीडिंग होते, नॅरो स्टूल, एनीमिया, सतत पोट दुखण्यासारखी लक्षण दिसू शकतात. मात्र, ही लक्षणं अल्सर,, हेमोरॉयड्समुळेही दिसतात. अशात डॉक्टरांशी संपर्क करून नेमकं काय ते जाणून घेता येईल. काही लक्षणं जसे की, विष्ठेतून रक्त येणे, जुलाब होणे, पुन्हा पुन्हा टॉयलेटला जाण्याची इच्छा होणे, मोठ्या आतडींमध्ये खाली वाढ होणे ही लक्षणं महिला आणि पुरूष दोघांमध्येही दिसतात.

कोलोन किंवा बाउल कॅन्सरचं धोका

जे लोक फार जास्त स्मोकिंग करतात त्यांना हा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. ज्यांना आधीच अल्सरेटिव कोलायटिस किंवा कोलोनमध्ये क्रॉन्स डिजीज असेल, त्यांनाही बाउल कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. त्यासोबतच लठ्ठपणाने ग्रस्त लोक, जास्त रेट मीट खाणाऱ्या लोकांनाही कोलोन किंवा बाउल कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. अशात तुम्ही रेग्युलर स्क्रीनिंग केलं पाहिजे. जेणेकरून समजून येईल की, तुम्हाला बाउल कॅन्सर आहे की नाही.
 

Web Title: Colon Cancer Symptoms : Warning signs and symptoms of colon cancer in stool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.