300 वर गेली असेल शुगर तर लगेच करा 'हा' घरगुती उपाय, लघवीतील जळजळही होईल कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 10:53 AM2024-02-22T10:53:07+5:302024-02-22T11:10:19+5:30

Diabetes Home Remedies: जर तुमची ब्लड शुगर लेव्हल फार जास्त राहत असेल तर तुम्ही औषधांसोबत काही घरगुती उपायही करू शकता.

Consume clove if your blood sugar is higher than 300 and can reduce diabetes | 300 वर गेली असेल शुगर तर लगेच करा 'हा' घरगुती उपाय, लघवीतील जळजळही होईल कमी!

300 वर गेली असेल शुगर तर लगेच करा 'हा' घरगुती उपाय, लघवीतील जळजळही होईल कमी!

Diabetes Home Remedies: डायबिटीस एक फार गंभीर आजार आहे. ज्यामुळे डोक्यापासून ते पायांपर्यंत नुकसान होतं. जर तुमची ब्लड शुगर लेव्हल फार जास्त राहत असेल तर तुम्ही औषधांसोबत काही घरगुती उपायही करू शकता.

उपाय नसलेला आजार

शुगर सायलेंट किलर आहे. जो हळूहळू डोळे आणि डॅमेज करतो. ब्लड शुगर नॉर्मल लेव्हलपासून एका पॉइंटच्या वर जाते तेव्हा समस्या होऊ लागते. जर तुमच्यासोबतही ही समस्या होत असेल तर तुम्ही औषधांसोबत एक घरगुती उपायही करू शकता.

तोंडात ठेवा लवंग

आयुर्वेद डायबिटिक पेशेंट्सना लवंग खाण्याचा सल्ला देतात. तुम्ही दिवसा किंवा रात्री झोपताना एक किंवा दोन लवंग तोंडात ठेवून त्यांचा रस प्यावा. याने तुम्हाला फायदा मिळू शकतो.

इन्सुलिनचं उत्पादन वाढतं

एप्रिल 2017 मध्ये Pubmed वर एक रिसर्च प्रकाशित झाला होता ज्यात लवंग आणि डायबिटीसमधील संबंध सांगण्यात आला. रिसर्चर्सना आढळलं की, लवंगमुळे सेल्स रक्तातून शुगर घेऊ लागतात आणि इन्सुलिन वाढतं. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल करण्यास मदत मिळते.

लघवीत जळजळीचा उपाय

यूटीआय इंफेक्शनच्या रूग्णांना लघवी करताना जळजळ होण्याची समस्या होते. ही समस्याही दूर करण्यास लवंग फायदेशीर ठरते. यात अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात जे यूटीआय करणाऱ्या बॅक्टेरियांना मारतात.

जेव्हा ब्लड शुगर लेव्हल वाढते तेव्हा शरीर ती लघवी्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं. यादरम्यान किडनी ब्लॅडर गोठण्याचा धोका असतो जो बॅक्टेरिया वाढण्यासाठी फायदेशीर असतो.

का होतो शुगरचा आजार? 

डायबिटीस एक मेटाबॉलिक डिजीज आहे ज्यात रक्तात ग्लूकोज लेव्हल वाढू लागते. असं तेव्हा होतं जेव्हा शरीरात इन्सुलिन लेव्हल कमी होऊ लागते. अनेकदा इन्सुलिन तयार तर खूप होतं, पण शरीर त्याचा वापर करू शकत नाही.

शुगर वाढवणारे फूड्स

तांदूळ, ब्रेड, नूडल्स, साखर, आर्टिफिशियल शुगर, रिफाइंड कार्ब्स, बटाटे, फ्राइड फूड आणि जंक फूडचं सेवन केल्याने अचानक ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.

Web Title: Consume clove if your blood sugar is higher than 300 and can reduce diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.