शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

Corona virus : शरीरात झपाट्यानं पसरेल कोरोना; जर उपचारादरम्यान हे औषध घ्याल; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 1:47 PM

Corona virus : लवकर रिकव्हर होण्याच्या नादात लोक स्टेरॉईड्सचा ओव्हर डोस घेत आहेत. ही गोष्ट धोकादायक ठरू शकते.

कोरोना व्हायरसच्या माहामारीत संपूर्ण देशभरातील लोकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयात आयसीयू बेड, ऑक्सिजनची कमतरता, औषधांची टंचाई यांमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण येत नसल्यानं सौम्य लक्षणं असलेल्यांना घरीच उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. अशावेळी लवकर रिकव्हर होण्याच्या नादात लोक स्टेरॉईड्सचा ओव्हर डोस घेत आहेत. ही गोष्ट धोकादायक ठरू शकते.

नवी दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार सिस्टमॅटिक स्टेरॉईडच्या ओव्हर डोजमुळे रुग्णांना नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. खासकरून जेव्हा सुरूवातीच्या स्टेजला या औषधांचा वापर केला जातो तेव्हा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. कोरोनाच्या इन्फेक्शनदरम्यान या औषधांचा वापर न करण्याचा तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. 

डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, ''लोकांना वाटतं की रेमडेसिविर आणि इतर औषधं स्टेरॉईड्सप्रमाणे मदत करतील. पण यांची गरज नेहमीच असतेच असं नाही. याबाबत लोकांना कल्पना नाही. म्हणून फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधं घ्यायला हवीत.  कोरोनाच्या २ स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये व्हायरसचं संक्रमण झाल्यानं तापची समस्या उद्भवते.  हळूहळू व्हायरस फुफ्फुसांपर्यंत पोहोचू लागतो. त्यानंर ऑक्सिजन लेव्हल  कमी होऊ लागते. अशावेळी एंटी व्हायरल ड्रग्स दिले जातात.'' 

''दुसऱ्या टप्प्यात संक्रमित व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती काम करणं पूर्णपणे बंद होते.  अशा स्थितीत शरीरात इंफ्लेमेटरी रिएक्शन वाढू लागते. यावेळी रुग्णाच्या शरीराला स्टेरॉईड्सची आवश्यकता असते. सुरूवातीच्या स्टेजला ही औषधं दिल्यास शरीरातील व्हायरसचे रेप्लिकेशन वाढू शकते.  म्हणजेच अशावेळी शरीरातील व्हायरस वेगानं आपली संख्या वाढवतो.'' असं ही ते यावेळी म्हणाले

 अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

 दरम्यान संक्रमण झाल्यानंतर लोक सीटी स्कॅन करत आहेत. ज्याच्या किमती खूपच वाढल्या आहेत. डॉ. रणदीप गुलेरिया यांनी इशारा दिला आहे की सिटी स्कॅनचा वापर करायचा की नाही ते  विचारपूर्वक ठरवायला हवे. त्यांनी सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगितले की,'' सीटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे प्रमाणे आहे, हे अत्यंत नुकसानकारक आहे.''

कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

 ''घरात आयसोलेशनमध्ये राहणारे लोक त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधत असतात. सेचुरेशन ९३ किंवा त्याहून कमी होत आहे,  हे अशक्त होण्याचे लक्ष आहे. अशा स्थितीत जर आपल्याला छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.'' असंही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यAIIMS hospitalएम्स रुग्णालयCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या