Corona virus : होळी खेळताना कोरोनाला बळी पडायचं नसेल, तर वाचा तज्ज्ञांनी सांगितलेल्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 03:42 PM2020-03-09T15:42:04+5:302020-03-09T15:45:30+5:30

सध्या कोरोना व्हायरसची भिती सगळ्यांच्याच मनात आहे. होळीच्या सणाच्या वेळी कोरोना व्हायरस जास्त प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. कारण त्यावेळी एकाच ...

Corona virus : Corona virus safety tips direct from experts for holi... | Corona virus : होळी खेळताना कोरोनाला बळी पडायचं नसेल, तर वाचा तज्ज्ञांनी सांगितलेल्या टिप्स

Corona virus : होळी खेळताना कोरोनाला बळी पडायचं नसेल, तर वाचा तज्ज्ञांनी सांगितलेल्या टिप्स

Next

सध्या कोरोना व्हायरसची भिती सगळ्यांच्याच मनात आहे. होळीच्या सणाच्या वेळी कोरोना व्हायरस जास्त प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. कारण त्यावेळी एकाच ठिकाणी अनेक लोक होळी खेळण्यसाठी येणार .अशावेळी हवेमार्फत इन्फेक्टेड व्यक्तीकडून इतरांपर्यंत हा आजार पोहोचण्याची शक्यता असते. रंगपंचमी खेळण्यासाठी पाण्याचा वापर खुप केला जातो. 

त्यामुळे व्हायरसचं संक्रमण सुद्धा होऊ शकतं. होळीच्या सणाला तुमची छोटी चुक सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकते. तुम्ही सुद्धा होळी खेळण्याच्या विचारात असाल तर घाबरण्यासारखं काही नाही. आज आम्ही तुम्हाला कोरोनापासून बचाव करून होळी कशी खेळता येईल याबाबत सांगणार आहोत.  होळी हा असा सण आहे. ज्यावेळी लोक एकमेकांवर रंग लावून रंगांनी खेळतात. पण  काही  गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्ही आणि तुमच्या घरातील व्यक्ती होळी खेळून सुद्धा चांगले राहतील.

१) लहान मुलांना पाण्याने होळी खेळू देऊ नका.

२) फक्त सुक्या रंगांनी होळी खेळाल तर व्हायरसचं संक्रमण होणार नाही. 

३) कोरोना व्हायरस हा हेवी असल्यामुळे एका जागेवरून इतर जागी ट्रॅव्हल करू शकतं नाही. अशात तुम्ही तर सुक्या रंगानी होळी खेळाल तर आरोग्याला धोका उद्भवणार नाही. 

४) होळीच्या वेळी स्वतःच्या शारीरिक स्थितीकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. कारण या दरम्यान हे समजणं कठीण असतं की नाक आणि डोळ्यांमधून पाणी का येत आहे. जर तुम्ही सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष  केलं तर जास्त त्रास होऊ शकतो. म्हणून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

५) होळी खेळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.  जर बाहेर पडत असाल तर कोणतं पाणी तुम्ही अंगावर घेत आहात याकडे लक्ष द्या. कारण बाहेर होळी खेळल्याने  दुषित पाण्याशी संपर्क येण्याची शक्यता आहे. 

६) होळी खेळताना हे गरजेचं नाही की तुम्ही पाणी वाया घालवून  होळी खेळायला हवी. तुम्ही कपाळाला रंगाचा टिळा लावून सुद्धा होळी खेळू शकता. ( हे पण वाचा-Corona virus : कोरोनापासून बचावासाठी कपल्सने 'अशी' घ्या काळजी...)

७) होळीला बाहेरचे तेलकट अन्नपदार्थ मागवण्यापेक्षा घरीचं तयार केलेलं खाण्याला प्राधान्य द्या. ( हे पण वाचा-काय असतं एग्स फ्रीज करणं? एकता कपूरने ३६ व्या वर्षीच केलं होतं...)

Web Title: Corona virus : Corona virus safety tips direct from experts for holi...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.