Corona virus :कोरोना व्हायरस आणि सामान्य फ्लू यातील फरक कसा ओळखाल? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 05:39 PM2020-03-08T17:39:26+5:302020-03-08T17:42:39+5:30
आज आम्ही तुम्हाला नॉर्मल फिवर आणि कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शन कसं ओळखायचं हे सांगणार आहोत.
(image credit- daily express)
सध्या कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून अनेक खबरदारीचे उपाय नागरीकांकडून घेताना दिसून येत आहेत. या सगळ्यात लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण आहे. त्यामुळे साधा ताप, आणि खोकला झाला असेल तरी कोरोना व्हायरसचे संक्रमण झालं असेल का अशी भीती निर्माण होते. आज आम्ही तुम्हाला नॉर्मल फिवर आणि कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शन कसं ओळखायचं हे सांगणार आहोत.
बदलत्या वातावरणात अनेक आजार पसरत असतात. लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना सुद्धा हे इन्फेक्शन आपलं शिकार बनवत आहेत. ज्या लोकांच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. त्यांना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो.
सामान्य तापाची लक्षणं
ताप आणि सर्दी
खोकला
अंगदुखी
प्राईवेट पार्ट्सजवळ इन्फेक्शन असणं
त्वचेवर फंगल इन्फेक्शन
फूड पॉयजनिंग
केस गळणे.
कोरोना व्हायरस आणि सामान्य फ्लू मधला फरक कसा ओळखाल
सध्याच्या दिवसात कोरोना व्हायरसने भारतातील अनेक राज्यात शिरकाव केला आहे. त्यामुळे सर्दी, ताप आणि खोकला असल्यावर लोक अनेकदा कंन्फुज होतात. की आपल्याला कोरोना व्हायरसची लागण जर झाली नाही ना असं त्यांना वाटत असतं. या आजारापासून बचाव करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून सुद्धा खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. पण नॉर्मल सर्दी तापाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे आजार होण्याची शक्यता असते. जर साधा ताप असेल तर लगेच बरा सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. ( हे पण वाचा-दिवसा की रात्री? कोणत्या वेळी बदाम खाणं अधिक फायदेशीर ठरतं?)
जर एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर वेळ न घालवता तपासणी करणं गरजेचं आहे. कोरोना व्हायरस व्यक्तीच्या रोगप्रतिकारकक्षमतेला खराब करू शकतो. त्यामुळे कोरोनाला न घाबरता आणि अफवांवर लक्ष न देता तुम्ही तुमची काळजी घेऊन या आजारापासून दूर राहू शकता. ( हे पण वाचा-रोज रात्री गरम पाणी प्यायल्याने बारिक होण्यासह 'या' आजारांपासून झटपट मिळेल सुटका)