सतत मास्कचा वापर करणं ठरू शकतं नुकसानकारक; डॉक्टरांनी सांगितले 'हे' दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 06:40 PM2020-12-21T18:40:05+5:302020-12-21T18:49:34+5:30

Health Tips in Marathi : सतत मास्कच्या वापरामुळे कोरोनापासून बचाव होत असला तरी आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या वाढत आहे.

Corona virus wearing masks for too long can also be harmful myupchar experts says | सतत मास्कचा वापर करणं ठरू शकतं नुकसानकारक; डॉक्टरांनी सांगितले 'हे' दुष्परिणाम

सतत मास्कचा वापर करणं ठरू शकतं नुकसानकारक; डॉक्टरांनी सांगितले 'हे' दुष्परिणाम

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी सगळ्यांनाच मास्कचा वापर  करण्याचे आवाहन केलं जात आहे. पण कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्कचा वापर, हात धुणं, सुरक्षित अंतर राखणं या उपयांचा वापर केला जात आहे. कोरोनाच्या माहामारीमुळे सारं काही बदललं. कधी मास्क लावायची सवय नसतानाही संसर्ग रोखण्यासाठी लोक मास्क वापरू लागले. सतत मास्कच्या वापरामुळे कोरोनापासून बचाव होत असला तरी आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या वाढत आहे. माय उपचारशी बोलताना डॉ. आयुष पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

डॉ. आयुष पांडे यांच्या सल्ल्यानुसार कोणत्याही निरोगी व्यक्तीसाठी मास्क घालणे आवश्यक नाही. कोणत्याही निरोगी व्यक्तीने केवळ तेव्हाच मास्कचा वापर करावा जेव्हा तो एखाद्या आजारी किंवा कोरोना असलेल्या व्यक्तीची काळजी घेत असेल. पुढे त्यांनी मास्कच्या वापरामुळे कोणत्या दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो याबाबत सांगितले आहे. 

डोकेदुखी

मास्क घातल्यावर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्यास, त्यात असलेले हायपरकेनिया डोकेदुखी आणि चक्कर येणे या सारखी समस्या वाढवू शकते. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या म्हणण्यानुसार, जास्त काळ मास्क लावल्याने शरीराला नुकसान पोहचू शकते. म्हणूनच जास्त गर्दीच्या ठिकाणीच मास्कचा वापर करा. 

धावताना मास्क वापरणं टाळा

धावताना किंवा चालताना कोणी मास्कचा वापर करत असेल तर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण धावताना प्राणवायूची अधिक आवश्यकता असते. याशिवाय, एन 95 चे मास्क केवळ आरोग्य कर्मचार्‍यांनाच आवश्यक आहे. इतर लोक घरगुती कपड्यांचे बनवलेले मास्क सुद्धा लावू शकतात. असे मास्क लावल्यास श्वास घेण्यात कोणतीही अडचण येत नाही. शक्यतो, सतत बाहेर जाण्यापेक्षा एकाचवेळी कशी जास्त कामं करता येईल याकडे लक्ष द्या. आधीपेक्षा जास्त घातक ठरू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन; संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली, तज्ज्ञांचा दावा

कापडाचा मास्क वापरत असाल तर रोजच्या रोज स्वच्छ करा

सूती कापडापासून मास्क बनवला जाऊ शकतो. सूती कापड हे आरामदायक देखील आहे. याचा वापर करताना मास्क सैल असावेत. घट्ट मास्क घातल्याने श्वास घेण्यात अडचण येते आणि नाकावर लाल चट्टे येतात.  लहान मुलांसाठी मास्क बनवताना हे लक्षात ठेवावे की कापड सूती आणि ते पातळ असावे, जेणेकरुन मुलांना श्वास घेण्यास त्रास होणार नाही.  डॉ.आयुष पांडे यांच्या म्हणण्यानुसार, एन 95, एन 99 मास्कचा वापराचे कोरोना संक्रमणाच्या प्रारंभापासून वाढले आहे, पण सामान्य लोकांना या मास्कपेक्षा कापडाच्या मास्क वापर केला तरी चालू शकते.  कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना लसीची गरज भासणार नाही? तज्ज्ञांनी सांगितले की.....

Web Title: Corona virus wearing masks for too long can also be harmful myupchar experts says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.