खुशखबर! भारत बायोटेकनं बनवली कोरोनाची नेझल लस; DGCI कडे परवानगीसाठी निवेदन

By manali.bagul | Published: January 8, 2021 03:28 PM2021-01-08T15:28:27+5:302021-01-08T15:41:42+5:30

CoronaVaccine News & Latest updates : रिसर्चनुसार ही लस इंजेक्शच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरू शकते. 

Coronal nasal vaccine developed by Bharat Biotech; Statement of permission for testing to DCGI | खुशखबर! भारत बायोटेकनं बनवली कोरोनाची नेझल लस; DGCI कडे परवानगीसाठी निवेदन

खुशखबर! भारत बायोटेकनं बनवली कोरोनाची नेझल लस; DGCI कडे परवानगीसाठी निवेदन

Next

कोरोनाच्या लसीबाबत भारतानं अजून एक पाऊल उचललं आहे. भारत बायोटकेनं कंपनीने आता नेझल स्प्रे लसीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला निवेदन दिलं आहे. चाचणीदरम्यान या नेझल स्प्रेचे चांगले परिणाम दिसून आल्यास कोरोनाच्या लढाईत यश मिळू शकतं. विशेष म्हणजे कोणत्याही इन्जेक्शनचा वापर न करता ही लस नाकाद्वारे दिली जाणार आहे. एका रिसर्चनुसार ही लस इंजेक्शच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरू शकते. 

भारत बायोटेकनं वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीसह मिळून नेझल स्प्रे लस तयार केली आहे. आता भारताता या  लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवागी मागण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सुरूवातीला या लसीची चाचणी, भूवनेश्वर, पुणे आणि हैदराबादमध्ये केली जाणार आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार ही लस १८ ते ६५ वयाच्या स्वयंसेवकांना दिली जाणार आहे. त्याआधी चाचण्या केल्या जाणार आहेत. 

coronavirus vaccine updates china first nasal spray covid19 vaccine approved for clinical trials | लढ्याला यश! चीनने तयार केली नेझल स्प्रेद्वारे दिली जाणारी कोरोना लस; नोव्हेंबरपासून चाचणीला सुरूवात 

कशी असते "नेझल लस"?

जगात आतापर्यंत बाजारात आलेल्या कोरोनावरील लशी या इंजेक्शनच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. पण नेझल लस ही नाकाच्या वाटे देण्यात येईल. कारण कोरोना व्हायरस सर्वाधिकपणे नाकावाटेच पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे नेझल स्प्रेच्या माध्यमातून दिली जाणार लस अधिक परिणामकारक ठरू शकते असा अंदाज आहे.  वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधनानुसार नाकावाटे लस दिली गेल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या पद्धतीने विकसीत होते. नाकात कोणत्याही पद्धतीचा संसर्गजन्य विषाणू येण्यास यातून रोखता येऊ शकतं. दिलासादायक! कोरोना रुग्णांचे जीव वाचवणार 2 नवी औषधं; जाणून घ्या किंमत

इंजेक्शनच्या तुलनेत जास्त प्रभावशाली ठरणार?

'नेझल स्प्रे'सारख्या लशीला जर मान्यता मिळाली तर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हे पाऊल मोठा कायापालट करणारे ठरू शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. कारण इंजेक्शनमुळे मानवाचे संपूर्ण शरीर सुरक्षित होतं असं ठामपणे सांगता येऊ शकत नाही. पण नाकावाटे स्प्रेच्या माध्यमातून लस दिली गेल्यास ती चेहऱ्यासह संपूर्ण शरीराला सुरक्षित ठेवण्यासासाठी उपयोगी ठरू शकते, असं तज्ज्ञांना वाटतं. 

आता हार्ट बीटने ओळखता येणार कोरोना पॉझिटिव्ह आहात की नाही? ;जाणून घ्या कसं ते

दरम्यान भारत बायोटेकने आयसीएमआर,  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने कोवॅक्सिन ही लस तयार केली होती. कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्‍ट्रेनमधून तयार केली होती. २०२१ च्या सुरूवातीच्या तीन महिन्यात ही लस भारतातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं कंपनीकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलं होतं.

Web Title: Coronal nasal vaccine developed by Bharat Biotech; Statement of permission for testing to DCGI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.