कोरोना व्हायसरपासून पसरत असलेल्या कोविड19 या आजाराबाबत लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. माय उपचारशी बोलताना एम्सचे डॉ. अजय मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे नाक, घसा हे अवयव प्रभावित होतात. सर्दी, खोकला आणि घसा खराब होणं, ताप ही सामान्य लक्षणं आहेत.या व्यतिरिक्त जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची वेगळी १२ लक्षणं समोर आली आहेत.
अशा स्थितीत छातीत दुखणं हे कोरोनाचं लक्षण असू शकतं का? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार छातीत दुखणं हे कोरोना व्हायरसचं लक्षण नसून छाती जड वाटणे, दीर्घ श्वास घेण्यासाठी त्रास होणं हे कोरोनाचं लक्षण असू शकतं.
ताप आणि छातीत वेदना होत असल्यास काय कराल
डब्ल्यूएचओने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार रुग्ण जर घरी एकटा राहत असेल आणि छातीत दुखणं, ताप, सर्दी , खोकला असेल तर लवकरात लवकर आयसोलेट करायला हवं. कारण जर रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर हळूहळू लक्षणांची तीव्रता कमी झालेली दिसून येईल. या दरम्यान संतुलित आहार घ्या. पौष्टीक पदार्थांचे सेवन करा. दिवसातून ३० मिनिट वेळ काढून व्यायाम करा.
अचानक छातीत दुखण्याचा त्रास झाला तर गॅससंबंधी समस्या किंवा हृदयाच्या आजारांचा धोका असू शकतो. पण श्वास घ्यायला त्रास होण्यासोबत छातीत वेदना होत असतील तर कोरोना व्हायरसची लक्षणं असू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार १२ कोरोनाची नवीन लक्षणं समोर आली आहेत. त्यात ताप आणि थकवा येणं या लक्षणांचा समावेश आहे. तुम्हालाही असा त्रास होत असल्यास घरातील लहान मुलांपासून आणि वयस्कर लोकांपासून लांब राहा.
कोरोना व्हायरसच्या नवीन लक्षणांमध्ये डोळे येणं, मळमळणं, अतिसार होणं यांचा समावेश आहे. याशिवाय थंडी वाजणे, श्वास घ्यायला त्रास होणं, मासपेशींमध्ये वेदना, डोकेदुखी, घसा खवखवणं, सुगंध न जाणवणं, श्वास घ्यायला त्रास होणं यांचा समावेश आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची नवी लक्षणं समोर आल्यानंतर अशा शारीरिक समस्या जाणवत असल्यास सगळ्यात आधी उपचार करायला हवेत.
श्वास सोडल्यानंतर १ तास हवेत जिवंत राहतो कोरोना विषाणू? तज्ज्ञांनी सांगितलं की...
'या' देशात लसीच्या मानवी चाचणीला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार; जाणून घ्या लस बाजारात कधी येणार