Coronavirus : खूशखबर! कोरोनाच्या ज्या औषधाला भारताने दिली मंजूरी, त्या औषधाने वैज्ञानिकांना मिळालं मोठं यश...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 12:18 PM2020-06-10T12:18:16+5:302020-06-10T12:30:30+5:30

ड्रग कंट्रोल जर्नल ऑफ इंडियाने 1 जूनला रेमडेसिवीरच्या वापराला परवानगी दिली होती.

Coronavirus : Gilead sciences remdesivir prevents lung damage on monkeys | Coronavirus : खूशखबर! कोरोनाच्या ज्या औषधाला भारताने दिली मंजूरी, त्या औषधाने वैज्ञानिकांना मिळालं मोठं यश...

Coronavirus : खूशखबर! कोरोनाच्या ज्या औषधाला भारताने दिली मंजूरी, त्या औषधाने वैज्ञानिकांना मिळालं मोठं यश...

Next

(Image Credit : netdoctor.co.uk)

कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी वापरलं जाणारं Gilead Sciences हे अॅंटीवायरल औषध रेमडेसिवीरचा माकडांवर चांगला प्रभाव बघायला मिळाला. एका नव्या रिसर्चनुसार, हे औषध कोरोना व्हायरसने संक्रमित माकडांच्या फुप्फुसांची समस्या दूर करतं. हा रिसर्च मंगळवारी जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झालाय.

aajtak.intoday.in ने दिलेल्या वृत्तानुसार, याआधी या रिसर्चच्या निष्कर्षांवर एप्रिल महिन्यात यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ द्वारे एका रिपोर्ट जारी केला होता. ड्रग कंट्रोल जर्नल ऑफ इंडियाने 1 जूनला रेमडेसिवीरच्या वापराला परवानगी दिली होती. गंभीर रूपाने आजारी कोरोनाच्या रूग्णांना डॉक्टरांकडून आता हे औषध दिलं जात आहे. 

रिसर्चनुसार, ज्या माकडांना रेमडेसिवीरचं औषध देण्यात आलं त्यांच्यात श्वसनासंबंधी कोणतीही समस्या दिसली नाही आणि या औषधाने त्यांच्या फुप्फुसांचं झालेलं नुकसानही कमी झालं. या रिसर्चच्या अभ्यासकांनी सांगितले की, रेमडेसिवीरने उपचार केल्या जात असलेल्या माकडांच्या फुप्फुसांमध्ये वायरल लोड किंवा वायरसचं प्रमाण कमी आढळलं.

अभ्यासकांनी सल्ला दिला की, COVID-19 च्या रूग्णांमध्ये निमोनिया थांबवण्यासाठी रेमडेसिवीर औषध लवकरात लवकर देण्यावर विचार केला गेला पाहिजे. रेमडेसिवीर कोरोना व्हायरसवर पहिलं असं औषध आहे जे मानवी परीक्षणात पूर्णपणे प्रभावी ठरलं. या औषधावर केल्या जात असलेल्या इतर क्लिनिकल रिसर्चवरही बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे.

रेमडेसिवीरला गेल्या महिन्यात जपानमध्ये वेकलरी नावाच्या ब्रॅन्ड अंतर्गत मंजूरी देण्यात आली होती. अमेरिका, भारत आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोना व्हायरसच्या गंभीर रूपाने आजारी रूग्णांना हे औषध इमरजन्सीमध्ये दिलं जात आहे. काही यूरोपीय देशही या औषधाचा वापर करत असल्याची सांगण्यात येत आहे.

एप्रिलच्या शेवटी जारी एका अमेरिकन क्लिनिकल परीक्षणानुसार, प्लेसिबो घेणाऱ्या रूग्णांच्या तुलनेत रेमडेसिवीर घेणाऱ्या रूग्णांचं हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण 31 टक्के कमी झालं आहे. गिलियडने गेल्या आठवड्यात रेमडेसिवीरच्या परीक्षणाच्या डेटात ही सूचना दिली होती. ज्यात सांगण्यात आलं होतं की, कोरोना व्हायरसची हलकी लक्षणे असलेल्या रूग्णांना या औषधाचा पाच दिवसाचा कोर्स देणं प्रभावी ठरलं होतं.

Coronavirus : कोरोना संसर्गाबाबत WHO कडून 'मोठी चूक', वाद पेटल्यावर चूक सुधारली!

भारताने शोधले कोरोनाचे उपचार; 'या' औषधांनी बरे होत आहेत रुग्ण, आईसीएमआरची परवानगी 

Web Title: Coronavirus : Gilead sciences remdesivir prevents lung damage on monkeys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.