कोरोना संक्रमणनं ग्रासलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी आता नवीन औषध तयार करण्यात आली आहेत. या औषधांनी मृतांच्या आकड्यांमध्ये एक चतृथांश कमतरता दिसून येऊ शकते. एनएचएसच्या इंटेंसिव केयर यूनिट (आईसीयू) मध्ये लसीची चाचणी करत असलेल्या संशोधकांनी सांगितले की, ''हे औषध ड्रॉपसच्या साहाय्यानं दिलं जाते. या औषधाच्या वापराने १२ पैकी एका रुग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो.'' वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधाचा पुरवठा संपूर्ण ब्रिटनध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे शेकडो लोकांचा जीव वाचवण्यासाठी या औषधाचा वापर केला जाऊ शकतो.
बीबीसीनं आपल्या रिपोर्टमध्ये या औषधांबाबत अधिक माहिती दिली आहे. यूकेच्या रूग्णालयात ३० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. मागील वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत हा आकडा ३९ टक्के जास्त आहे. ब्रिटनमधील रुग्णांसाठी टॉसिलीझुमब आणि सुरिलोमब उपलब्ध आहेत. औषधांचे नियोजन सुनिश्चित करण्यासाठी यूके सरकार फार्मास्युटिकल कंपनीशी सतत संपर्क साधत आहे. जीव वाचण्याव्यतिरिक्त, या औषधांच्या वापरामुळे रुग्ण लवकर रिकव्हर होत आहेत आणि गंभीर आजारी रूग्णांना एका आठवड्यासाठी आयसीयूमध्ये ठेवणे आवश्यक आहे. ही दोन्ही औषधं दररोजच्या रुग्णालयाच्या खर्चापेक्षा कमी प्रमाणात तितकेच प्रभावी आहेत.
ही औषधं फारशी स्वस्त नाहीत. यांची किंमत प्रती रुग्णासाठी ७५० पाऊंड म्हणजे ६९ हजार ७८४ रूपये इतकी आहे. तर डेक्सामेथासोनची किमंत ५ पाऊंड म्हणजे जवळपास ५०० रूपयांपर्यंत आहे. ब्रिटनसह सहा वेगवेगळ्या देशांमधील सुमारे८०० आयसीयू रूग्णांवर रीमॅप-कॅप चाचणी घेण्यात आली. योग्य काळजी घेतलेल्या कोविड रूग्णांपैकी जवळजवळ ३६% मरण पावले.
आयसीयूमध्ये दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत ही नवीन औषधे दिल्यामुळे मृत्यूंची संख्या चतुर्थांश घसरून २७ टक्क्यांवर गेली. एनएचएसचे राष्ट्रीय वैद्यकीय संचालक प्राध्यापक स्टीफन पोविस म्हणाले, "आता कोरोना रूग्णांचे मृत्यू कमी करण्यासाठी आणखी एक औषध आले आहे. कोरोना विषाणूविरूद्धच्या लढ्यात हे खूप आनंदी आणि सकारात्मक पाऊल आहे."
आता हार्ट बीटने ओळखता येणार कोरोना पॉझिटिव्ह आहात की नाही? ;जाणून घ्या कसं ते
ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक म्हणाले, 'ब्रिटनने वेळोवेळी सिद्ध केले आहे आणि हे पुन्हा करीत आहे की, रुग्णांना सर्वांत आशाजनक आणि चांगले उपचार देण्याच्या बाबतीत ते आघाडीवर आहेत. तथापि, या औषधांचे साईड इफेक्ट्स असू शकतात. रुग्णांना जास्त प्रमाणात हे औषध दिल्यास कोविड फुफ्फुसं आणि इतर अवयवांचे नुकसान करू शकते. '
४ राज्यात बर्ड फ्लूचा कहर; चिकन आणि अंडी खाणं कितपत सुरक्षित? जाणून घ्या फॅक्ट्स
डॉक्टरांना सल्ला देण्यात येत आहे की अशा सर्व रुग्णांना हे औषध द्यावे जे गंभीर अवस्थेत आहे आणि ज्यांना डेक्सामेथासोन देऊनही काळजी घ्यावी लागेल. टोसिलीझुमब आणि सुरिलुमब या दोन्ही औषधांवर सरकारने बंदी घातली आहे. या संशोधनात जे समोर आले आहे त्याचा आढावा घेण्यात आला नाही, हे कोणत्याही वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले नाही.