Coronavirus : रूग्णांच्या मदतीसाठी फॉर्म्यूला वन टीमचा खास फंडा, अनेकांना मिळणार जीवनदान!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 11:47 AM2020-03-31T11:47:42+5:302020-03-31T11:47:49+5:30

फॉर्म्यूला वन टीम मर्सिडिजने तयार केलेल्या या यंत्रामुळे रूग्णांना आयसीयूमध्ये राहण्याची गरज पडणार नाही. महत्वाची बाब म्हणजे इटली आणि चीनमध्ये या यंत्राचा यशस्वी वापर करण्यात आला. 

Coronavirus: Mercedes F1 team helps to create breathing aid to keep coronavirus patients out of intensive care api | Coronavirus : रूग्णांच्या मदतीसाठी फॉर्म्यूला वन टीमचा खास फंडा, अनेकांना मिळणार जीवनदान!

Coronavirus : रूग्णांच्या मदतीसाठी फॉर्म्यूला वन टीमचा खास फंडा, अनेकांना मिळणार जीवनदान!

Next

जगभरात कोरोनाला मात देण्यासाठी वैज्ञानिकांच्या टीम दिवसरात्र काम करत आहेत. वेगवेगळ्या गोष्टींवर रिसर्च केला जात आहे. अशात या महामारीने संक्रमित झालेल्या रूग्णांना आराम देण्यासाठी फॉर्म्यूला वन टीम मर्सिडिजने एक खास यंत्र तयार केलं आहे. मर्सिडिजने कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांना श्वास घेण्यास मदत करण्यासाठी हे यंत्र तयार केलं आहे. या यंत्रामुळे रूग्णांना आयसीयूमध्ये राहण्याची गरज पडणार नाही. महत्वाची बाब म्हणजे इटली आणि चीनमध्ये या यंत्राचा यशस्वी वापर करण्यात आला. 

इटली आणि चीनमध्ये वापर

टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, फॉर्म्यूला वन टीम मर्सिडिजने युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधील इंजिनिअर्स आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हॉस्पिटलमधील डॉक्टरांसोबत मिळून हे यंत्र तयार केलं आहे जे ऑक्सिजन मास्क आणि व्हेंटिलेशनमधील कमतरता भरून काढतं. या यंत्राला कन्टीन्यूअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर असं नाव देण्यात आलं आहे. ज्याचा वापर महामारीदरम्यान इटली आणि चीनमध्ये रूग्णांच्या फुप्फुसांमध्ये ऑक्सिजन पाठवण्यासाठी केला होता.

इटलीमध्ये अर्ध्या रूग्णांवर वापर

रिपोर्टमध्ये हेही सांगण्यात आलं आहे की, इटलीमध्ये ज्या रूग्णांवर याचा वापर करण्यात आला होता, त्यातील अर्ध्या रूग्णांना आयसीयूची गरज पडली नाही. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हॉस्पिटलचे क्रिटिकल केअऱ कन्सल्टेंट प्राध्यापक मर्विन सिंगर म्हणाले की, या यंत्राने अनेकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. याच्या वापराने केवळ तेच रूग्ण आयसीयूचा वापर करू शकतील ज्यांची स्थिती फार गंभीर आहे. आशा आहे की, या यंत्राने ब्रिटनमध्ये अनेकांचा जीव वाचेल.

घरातही केला जाऊ शकतो वापर

यूसीएलचे प्राध्यापक डेविड लोमस म्हणाले की, हे यंत्राने अनेकांना आयसीयूची गरज पडणार नाही. म्हणजे अशा स्थितीत फार जास्त गंभीर असलेल्यांना आयसीयूचा वापर करता येईल. याने अनेक लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि ही समस्या दूर करायची असेल तर तुम्ही घरातही याचा वापर करू शकता.

कसं करतं काम?

 या यंत्राच्या मदतीने ऑक्सिजन आणि हवा तोंडावाटे-नाकावाटे सतत कमी गतीने रूग्णाच्या आत पाठवली जाते. याने फुप्फुसात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. यूसीएलमधून सांगण्यात आलं आहे की, हे यंत्र ब्रिटनमध्ये वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे आणि क्लिनिकल ट्रायलसाठी 100 यंत्र हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.


Web Title: Coronavirus: Mercedes F1 team helps to create breathing aid to keep coronavirus patients out of intensive care api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.