दिलासादायक बातमी! एकदा पॉझिटिव्ह झाल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोना संक्रमणाचा धोका कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 09:38 PM2021-06-20T21:38:48+5:302021-06-20T21:39:36+5:30

आपल्याला एकापेक्षा अधिक वेळा कोरोना संक्रमण होऊ शकते का, यासंदर्भात लोक अत्यंत चिंतित आहेत. हे अम्हालाही माहित आहे की, लोक एकहून अधिक वेळा कोरोना संक्रमित होऊ शकतात. पण...

CoronaVirus New data suggests low risk of covid 19 reinfection in population | दिलासादायक बातमी! एकदा पॉझिटिव्ह झाल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोना संक्रमणाचा धोका कमी

दिलासादायक बातमी! एकदा पॉझिटिव्ह झाल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोना संक्रमणाचा धोका कमी

googlenewsNext

लंडन - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच इंग्लंडच्या आरोग्य विभागाकडून दिलासादायक वृत्त आले आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडने (PHE) कोरोना व्हायरसच्या रिइंफेक्शनसंदर्भातील एक डेटा गुरुवारी जारी केला. यात, एकदा कोरना संक्रमण झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा संक्रमण होण्याचा धोका कमी आहे, असे नव्या डेटावरून समोर आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा डेटा दुसऱ्यांदा कोरना संसर्ग झालेल्या लोकांवर लक्ष ठेवणे आणि आजाराचे वर्तन समजून घेण्यासाठी सार्वजनिक करण्यात आला आहे.

दुसऱ्यांदा संक्रमित होणाऱ्या लोकांची संख्या कमी - 
या अहवालात दावा करण्यात आला आहे, की दुसऱ्यांदा कोरोना संक्रमण झालेल्या लोकांची संख्या अत्यंत कमी आहे. इंग्लंडमध्ये महामारीच्या सुरुवातीपासून ते 30 मे 2021 पर्यंत 15,893 लोकांनाच दुसऱ्यांदा कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान संपूर्ण इग्लंडमध्ये एकूण 40 लाख लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. 

लोकांच्या मनात दुसऱ्यांदा संक्रमित होण्याची भीती -
पब्लिक हेल्थ इंग्लंडमधील कोरोना स्ट्रॅटजिक डायरेक्टर डॉ. सुसान हॉपकिंस यांनी म्हटले आहे, की "आपल्याला एकापेक्षा अधिक वेळा कोरोना संक्रमण होऊ शकते का, यासंदर्भात लोक अत्यंत चिंतित आहेत. हे अम्हालाही माहित आहे की, लोक एकहून अधिक वेळा कोरोना संक्रमित होऊ शकतात. मात्र, भविष्यात दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे, असे हा डेटा दर्शवतो. मात्र, यासंदर्भात आम्ही असंतुष्ट आहोत.

दुसऱ्यांदा संक्रमित झालेल्या लोकांत लक्षणे दिसत नाहीत - 
ते म्हणाले, कुठल्याही संक्रमणाची शक्यता कमी करण्यासाठी लशींचे दोन्ही डोस आणि दरवेळा मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. हा डेटा जून 2020 ते मे 2021 अखेरपर्यंतच्या रिइंफेक्शनची शक्यता दर्शवतो. असे असले तरी, आम्ही दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित झालेल्या लोकांवर लशीचा प्रभाव आणि आजाराचे गांभीर्य यांवर लक्ष ठेऊ. तसेच दुसऱ्यांदा कोरोना झालेल्या अधिकांश रुग्णांत लक्षणे दिसत नाहीत, असेही ते म्हणाले.
 

Web Title: CoronaVirus New data suggests low risk of covid 19 reinfection in population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.