काळजी वाढली! कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक संक्रामक; तरूणांना सगळ्यात जास्त धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 11:38 AM2020-12-23T11:38:43+5:302020-12-23T11:46:50+5:30

CoronaVirus News & Latest Updates : भारतासह इतर ४० देशांमध्ये ब्रिटनमधून येत असलेली विमानं रोखण्यात आली आहेत.

Coronavirus new strain can be superspreader affecting young says study | काळजी वाढली! कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक संक्रामक; तरूणांना सगळ्यात जास्त धोका

काळजी वाढली! कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक संक्रामक; तरूणांना सगळ्यात जास्त धोका

googlenewsNext

ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन अधिक संक्रामक असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाचं हे नवं रूप तरूणांसाठी जास्त धोकादायक ठरू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्र सरकारने या व्हायरसबाबत धोक्याची सुचनी दिली असून मागच्या एका महिन्यात ब्रिटनमधून भारतात आलेल्या लोकांच्या तपासणीवर लक्ष दिले  जाणार आहे. भारतासह इतर ४० देशांमध्ये ब्रिटनमधून येत असलेली विमानं रोखण्यात आली आहेत.

तरूणांना शिकार बनवू शकतो व्हायरसचा नवीन स्ट्रेन

नीती आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचं नवं रूप खूप संक्रामक असून वेगाने पसरत आहे. युरोपीय सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनं दिलेल्या माहितीनुसार हा व्हायरस तरूणांना जास्त प्रमाणात प्रभावित करू शकतो. वैज्ञानिकांनी या नवीन व्हायरसच्या स्ट्रेनचे नाव B.1.1.7. असं ठेवलं आहे. दरम्यान पॉल यांनी सांगितले की, ''भारतात कोरोनाच्या या नवीन  स्ट्रेनबाबत अधिक माहिती प्राप्त झालेली नाही. आतापर्यंत उपलब्ध असलेले आकडे, विश्लेषण यांच्या आधारावर या नवीन व्हायरसला घाबरण्याची आवश्यकता नाही असं दिसून येत आहे. पण तरिही आधीपेक्षा जास्त सावधगिरी आता बाळगावी लागणार आहे. ''

त्यांनी सांगितले की, ''व्हायरसच्या नवीन रूपात झालेला बदल लक्षात घेता कोरोनाच्या गाईडलाईन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. खासकरून ज्या देशात लसीकणाला सुरूवात झाली आहे. त्या देशात या व्हायरसच्या स्ट्रेनचा काहीही परिणाम होणार नाही असा अंदाज लावला जात आहे.'' 

पुढे त्यांनी असंही सांगितलं की, ''हा नवीन व्हायरस ७० टक्के जास्त संसर्गजन्य ठरू शकतो. याला सुपर स्प्रेडर म्हटलं जात आहे.  पण व्हायरसच्या या नवीन स्ट्रेनमुळे मृत्यू तसंच रूग्णालयात भरती होण्याने गंभीर स्वरूपातून आजारी होण्याचा धोका वाढत नाही.  पण लोकांमध्ये वेगाने संक्रमण पसरण्याचा धोका वाढत आहे.''

CoronaVirus : ...म्हणून कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी महिला सक्षम; पण पुरूषांना धोका जास्त

ब्रिटनमध्ये एका प्रयोगशाळेत RT-PCR चाचणीदरम्यान कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनबाबत माहिती मिळाली.  चाचणीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार हा  नवा व्हायरस कोविड १९ च्या तुलनेत अधिक संक्रामक आहे. दरम्यान वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार  व्हायरसच्या या नवीन स्ट्रेनमुळे व्हायरसच्या लसीवर कोणताही परिणाम होणार नाही.  खोटं बोलून विमानात बसणं कोरोना रुग्णाला महागात पडलं; एका तासाच्या आत गमावला जीव

Web Title: Coronavirus new strain can be superspreader affecting young says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.