चिंताजनक! आधीपेक्षा अधिक वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; बचावासाठी CDC नं सांगितला प्रभावी उपाय
By manali.bagul | Published: February 22, 2021 07:59 PM2021-02-22T19:59:44+5:302021-02-22T20:09:46+5:30
CoronaVirus News & Latest Updates : सेंटर ऑफ डिजीज अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या मते, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी डबल मास्क हा एक चांगला पर्याय असू शकतो.
भारतात कोविड १९ च्या केसेसमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मास्क न घालता घराबाहेर पडणं धोक्याचं कारण ठरू शकतं. मास्क वापरत असताना कोरोनाची लस घेणंही तितकंच गरजेचं आहे. नवीन उपायानुसार डबल मास्क वापरणं कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सुरक्षित ठरू शकतं. अमेरिकेत अलिकडच्या काही महिन्यांमध्ये डबल मास्कचा ट्रेंड चर्चेत आला आहे. बरेच लोक स्वत: चे रक्षण करण्यासाठी होममेड मास्क वापरत आहेत. सेंटर ऑफ डिजीज अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या मते, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी डबल मास्क हा एक चांगला पर्याय असू शकतो. सीडीसीने डबल मास्क अधिक चांगले वापरात येण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत.
डबल मास्क अधिक सुरक्षित आहे?
सीडीसीने केलेल्या अभ्यासानुसार कोविड -१९ पासून संरक्षण करण्यासाठी डबल मास्क अधिक सुरक्षित आहे. अभ्यासात असे आढळले आहे की, हे मुखवटे विषाणूचा प्रसार कमी करण्यास मदत करतात. डबल मास्क सिंगल मास्कपेक्षा जास्त संरक्षण प्रदान करतो आणि कोरोना विषाणूचा प्रसार रोखतो. डबल मास्क अतिरिक्त थर एक घट्ट अडथळा निर्माण करते जी सूक्ष्मजंतू आणि विषाणूंना संसर्ग पसरविण्यास प्रतिबंधित करते. कोणत्याही संसर्गाचा फैलाव कमी करण्यातही ते अधिक चांगले कार्य करू शकते.
डबल मास्क कोणी वापरायला हवा?
डबल मास्क वापरणं फायदेशीर आहे. पण त्यामुळे अस्वस्थही वाटू शकतं. त्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका जास्त आहे त्यांनी डबल मास्कचा वापर करायला हवा. आरोग्य कर्मचारी , सॅनिटेशन कर्मचारी यांना डबल मास्क वापरण्याची गरज असते.
कोणत्या जागी डबल मास्क वापरायचा?
डबल मास्क परिधान केल्यामुळे तुमचं संरक्षण होऊ शकतं. पण प्रदूषित ठिकाणी, सार्वजनिक वाहतूक, गर्दीच्या ठिकाणी, रुग्णालये आणि कमी व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी डबल मास्क वापरायला हवा.
नाक आणि तोंड झाकणं गरजेचं आहे का?
मास्क योग्यरित्या वापरला गेला तर तो केवळ कोरोना विषाणूपासून संरक्षण करेल. जर आपण तोंड आणि नाक झाकले नाही तर विषाणूचा प्रसार होऊ शकतो आणि मास्क लावूनही संरक्षण होणार नाही. म्हणून, डबल मास्कने देखील नाक आणि तोंड व्यवस्थित झाकले पाहिजे. बाजारात मास्कचे अनेक डिझाइनर पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला जे तपासण्याची आवश्यकता आहे ते म्हणजे फिटिंग, सामग्री, गुणवत्ता आणि श्वास घेण्याची क्षमता. CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी आली समोर
सर्जिकल मास्कवर कपड्याचा मास्क लावण्याचा प्रयत्न करा. यामुळे व्हायरस सहज प्रवेश करण्यास प्रतिबंधित होईल. दोन डिस्पोजेबल मास्क एकावर एक घालू नका. शक्य असल्यास, कपड्याचा मुखवटा वापरा. ते चांगल्या फॅब्रिकचे बनलेले असावे. कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की....