कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून दिवसेंदिवस धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. अमेरिकेची प्रमुख आरोग्यसंस्था सीडीसीने (Centers for Disease Control and Prevention) कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत नवीन गाईडलाईन्स दिल्या आहेत. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचा प्रसार हवेच्या माध्यमातूनही होऊ शकतो. याआधीही सीडीसीने याबाबत माहिती दिली होती.
टाईम्स ऑफ इंडीयाने दिलेल्या वृत्तानुसार नवीन गाईडलाईन्सनुसार सीडीसीच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे की, लहान लहान ड्रॉपलेट्स आणि कणांच्या संपर्कात आल्यामुळे संक्रमण वेगाने पसरते. हवेत हे ड्रॉपलेट् किंवा व्हायरसचे कण दीर्घकाळ तसेच राहिल्यामुळे लोकांना संक्रमणाचा धोका असतो. लोक संक्रमित व्यक्तीपासून ६ फुटांच्या अंतरावर असतानाही संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो.
सीडीसीच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
व्हायरसच्या या प्रकारच्या प्रसाराला एअरबोर्न ट्रांसमिशनच्या नावाने ओळखलं जातं. कोरोनाशिवाय इतर जीवघेणे आजारही या माध्यमातून पसरण्याचा धोका असतो. व्हेंटिलेशन नसलेल्या ठिकाणी, पुरेशी हवा खेळती नसलेल्या ठिकाणी या प्रकारचे संक्रमण मोठ्या प्रमाणात परसण्याचा धोका असतो. व्यायाम करताना, बोलताना, हसताना सुरक्षित अंतर न पाळल्यास ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून कोरोना संक्रमणाचा धोका वाढतो. कोरोना संक्रमित व्यक्ती एखाद्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी जात असलेल्या इतर लोकांनाही कोरोनाचा धोका जास्त असतो.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एअरबोर्न ट्रांसमिशनपासून बचाव करणं महत्वाचे आहे. कारण कोरोना संक्रमित व्यक्तीकडून श्वास घेताना, बोलताना हजारोंच्या संख्येने व्हायरसने भरलेले एअरोसोल्स बाहेर येत असतात. अनेकदा तोंडातून किंवा नाकातून बाहेर येत असलेले ड्रॉपलेट्स इतके लहान असतात की डोळ्यांना दिसूही शकत नाहीत.
अनेकदा हे ड्रॉपलेट्स सुकतात. ड्रॉपलेट्स संक्रमित व्यक्तीकडून जितक्या दूर जातात तितकंच ड्रॉपलेट्स कॉन्संट्रेशनही कमी होतं. गुरूत्वाकर्षणामुळे मोठे ड्रॉपलेट्स जमीनीवर पडतात. तर लहान ड्रॉपलेट्स हवेत पसरतात. सीडीसीच्या नवीन गाईडलाईन्सनुसार ६ फुटांच्या अंतरावरूनही संक्रमित व्यक्ती इतरांपर्यंत कोरोनाचं संक्रमण पसरवू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. दिलासादायक! कोरोना लसीबाबत WHO च्या प्रमुखांची मोठी घोषणा; तज्ज्ञ म्हणाले की.....
उपाय
हवेतून संसर्गाची शक्यता ही बंद जागेत जास्त लोक जमल्यावरच असल्याने हे टाळावे व कामाच्या ठिकाणी शक्यतो दार, खिडक्या उघडी ठेवावी. लग्नसमारंभ, धार्मिक स्थळ, बार अशा बंद जागेत जास्त गर्दी होते अशी ठिकाण जाणे टाळावे. हवेतून संसर्गाची शक्यता गृहीत धरली तरी सर्वांनी मास्क वापरल्यास बचाव होईलच. सोशल डिस्टन्सिंग पाळणे सुरू ठेवावे. या गोष्टी पाळल्या तर आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो. लोकांना सामान्य आयुष्य जगू द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४०० वैज्ञानिकांची मागणी