भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या प्रसाराबाबत मोठं विधान केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस पू्र्णपणे नष्ट होणं शक्य नाही. WHO च्या आपातकालिन विभागाचे प्रमुख डॉक्टर माईक रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस आता जगभरात वेगाने पसरत आहे.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार जिनिव्हाधील ऑनलाईन बैठकीत त्यांनी सांगितले की, अशा स्थितीत कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होईल असं वाटत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार रोखून जगाला पुन्हा लॉकडाऊनसारख्या स्थितीत जाण्यापासून रोखता येऊ शकते. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही कारण कोरोना विषाणूंचा प्रसार वेगाने वाढत आहे.
आयलँडसह अनेक देशांनी कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले आहे. पण संक्रमणाचा धोका कमी झालेला नाही. WHO तील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शतकातून एकदा येत असलेल्या या माहामारीचा वेग प्रचंड वाढत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळालेलं नाही. दरम्यान देशातील कोरोना रुग्णांनी नवीन उच्चांक गाठला असून आता धडकी भरवणार आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 27,114 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 519 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने 22,123 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 8,20,916 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी आत्तापर्यंत गंभीर आजारात वापरात असेलेल्या औषधांचा वापर केला जात होता. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसवर लस आणि औषध शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. तर भारतातील फार्मा बायोटेक, अमेरिकेतील मॉडर्ना आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची लस अंतीम टप्प्यात आहे.
coronavirus: सिप्लाने बनविले कोरोनावरील जगभरातले सर्वात स्वस्त जेनेरिक औषध