चिंताजनक! या देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार; आरोग्यमंत्र्याचा धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 12:00 PM2021-02-02T12:00:18+5:302021-02-02T12:09:24+5:30
CoronaVirus News & Latest Updates : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संक्रमणाच्या प्रकरणात २०० टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. याचे प्रमुख कारण सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या सभा हे होतं.
सौदी अरेबियात कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरण अभियान सुरू असतानाच माहामारीच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढत आहे. आरोग्यमंत्री तैफिन अल रबिया यांनी दिलेल्या माहितीनुसार सौदी अरेबियात कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच लोकांनी माहामारीचा प्रसार थांबवण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. दर आठवड्याला संक्रमणाच्या नवीन केसेस समोर येत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संक्रमणाच्या प्रकरणात २०० टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. याचे प्रमुख कारण सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या सभा हे होतं.
सौदी अरेबियामध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणं अशीच घटना वाढत राहिल्यास बर्याच देशांना यापूर्वी सामोरे गेलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. असा इशारा आरोग्यमंत्री तौफिग अल रबिया यांनी दिला. ते म्हणाले की, ''जर कोरोनाच्या बचाव उपायांकडे दुर्लक्ष केले गेले तर आम्हाला नक्कीच कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करावा लागेल.'' सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी येथे कोरोना संसर्गाची २५५ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर एका महिन्यापूर्वी दररोज केवळ ८० प्रकरणांची नोंद झाली आहे. सध्या येथे कोरोना संसर्ग तीन लाख ६८ हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे, तर सहा हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.
अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की आफ्रिका खंडात कोरोना विषाणूची दुसरी लाट आहे. यासंदर्भात संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने इशारा दिला आहे आणि म्हटले आहे की साथीच्या रोगाची दुसरी लाट बर्याच दिवसांसाठी इथेच राहू शकेल. बर्याच आफ्रिकन देशांमध्ये कोरोनाचे नवीन स्ट्रेन आतापर्यंत सापडले आहे. ओव्हेरियन कॅन्सरचं कारण ठरू शकतं वजन वाढणं; महिलांनी 'या' लक्षणांकडे वेळीच द्यायला हवं लक्ष
ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचे नवीन स्ट्रेन अधिक संसर्गजन्य ठरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आतापर्यंत 70 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा स्ट्रेन 30 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. अमेरिकेत, या दोन्ही प्रकारांमधील संसर्गग्रस्त लोक आढळले आहेत, तर भारतात केवळ ब्रिटनचा स्ट्रेन लोकांच्या चितेंच कारण ठरला आहे. Brushing Tips: रोज दात घासूनही पिवळेच दिसतात? मग वेळीच जाणून घ्या योग्य पद्धत, दुर्गंधीसुद्धा होईल दूर