गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. जीवघेण्या कोरोनाची लस तयार करण्यासाठी जगभरातील कंपन्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या लस निर्मीतीबाबत सध्या नवीन माहिती समोर येत आहे. रिलायंस लाईफ सायंसेज कंपनीचा समावेशही लसनिर्मिती करत असलेल्या कंपन्यांमध्ये झाला आहे. या कंपनीला कोरोनाची लस विकसित करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक, सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया, जायडस कॅडीला यांसारख्या कंपन्याही लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि सरकारने दिलेल्या माहितीनुसार पुढच्यावर्षी सुरूवातीच्या तीन महिन्यांमध्ये कोरोनाच्या दोन लसी यशस्वीरित्या तयार होऊ शकतात. कोरोना लसीच्या शर्यतीत आता अजून एका कंपनीची भर पडली आहे. ती म्हणजे रिलायंस लाइफ साइंसेज (RLS) मुकेश अंबानी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीजचे प्रतिनिधित्व करणारी ही कंपनी कोरोनाची लस तयार करणार आहे. या महिन्यापासून या लसीची प्राण्यांवरील प्री क्लिनिकल टेस्ट सुरू होणार आहे. रिलायंसने जी नवीन लस तयार केली आहे. ती लस रीकॉम्बिनेंट प्रोटीनबेस्ड कोविड लस आहे.
२०२१ च्या पहिल्या तीन महिन्यात या लसीच्या चाचणीचे परिणाम समोर येऊ शकतात. कोरोना काळात या कंपनीकडून टेस्टिंग कीट्ससह लॅबोरेटरी उत्पादनं तयार केली गेली आहेत. आता लसीची निर्मिती, वितरण, यांकडेही कंपनीकडून लक्ष केंद्रीत केलं जात आहे. WHO च्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षाच्या शेवटापर्यंत कोरोनाची यशस्वी लस तयार होऊ शकते. सर्व देशांमध्ये या लस समान प्रमाणात पुरवण्याचा विचार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख एडनॉम गेब्रियेसस यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस यावर्षाच्या शेवटापर्यंत उपलब्ध होऊ शकते. त्यांनी सांगितले की, आपल्याला व्हायरसशी लढण्यासाठी संपूर्ण ताकद लावायला हवी.
२०२१ च्या जुलैपर्यंत भारतातील २५ कोटी लोकांना देणार कोरोनाची लस
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन 'संडे संवाद' या कार्यक्रमाद्वारे कोरोना लसीसह महत्त्वाची माहिती दिली होती. जुलै 2021 पर्यंत भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा मानस असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोनाची लस कधी येणार याची सविस्तर माहिती दिली होती. भारतात ४०० ते ५०० दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. ....म्हणून फक्त सिगारेटच नाही तर सिगारेटचं थोटुकही ठरू शकतं जीवघेणं; तज्ज्ञांचा दावा
साधारणपणे भारतातील २० ते २५ कोटी लोकांपर्यंत पुढच्या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं होतं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. आयुष-64 औषधानं होईल कोरोना संक्रमणापासून बचाव; आयुष मंत्रालयानं दिल्या 'या' गाईडलाईन्स