CoronaVirus News : चिंताजनक! ....तर भारतात ऑगस्टपर्यंत १० लाख मृत्यू होणार; अमेरिकन रिसर्च संस्थेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 05:05 PM2021-05-04T17:05:10+5:302021-05-04T17:17:12+5:30
CoronaVirus News & Latest Updates : भारतातात माहामारी आता नियंत्रणाबाहेर जात आहे.
भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात मंगळवारी गेल्या २४ तासात जवळपास ३ हजार ४४९ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान अमेरिकेतील ग्लोबल रुग्णालयातील हेल्थ रिसर्च संस्थेनं अनुमान लावलं आहे की, कठोर उपाय करण्यात आले नाही तर १ ऑगस्ट २०२० पर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो.
या संस्थेनं या तारखेपर्यंत ९,६०,००० मृत्यूचं अनुमान लावलं होतं. या जीवघेण्या आजारामुळे मागच्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७८ टक्क्यांनी वाढली होती. अमेरिकेत बायडन प्रशासनाचे प्रमुख अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जैक सलीवियन यांनी एबीसी न्यूजशी बोलताना सांगितले की भारतातात माहामारी आता नियंत्रणाबाहेर जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रसारात अमेरिकेनं भारतासाठी १०० मिलियन डॉलरची मदत जाहीर केली आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतातून येत असलेल्या प्रवाश्यांवर बंदी घातली जेणेकरून कोरोना संक्रमणात वाढ होणार नाही. इंस्टीट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स एंड इवॅल्यूएशन (IHME) नं आपल्या पॉलिसी ब्रीफिंगमध्ये सांगितले की, आरोग्य व्यवस्था चांगली बनवण्यासाठी उपाययोजना न केल्यास, सोशल डिस्टेंसिंगचे पालन आणि फेसमास्कचा वापर टाळल्यास भारतात आणखी गंभीर स्थिती येऊ शकते.
अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार
सिएटलमधील युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंगटनमधील संस्थान इंस्टिट्यूट फॉर मेट्रिक्स एंड इवॅक्यूएशनने अंदाज लावला आहे की, एक ऑगस्ट २०२१ पर्यंत भारतात १,०१९, ००० लोकांना मृत्यूचा सामना करावा लागू शकतो. २५ ते ३० एप्रिलच्या आकडेवारीनुसार हे अनुमान लावण्यात आलं आहे. सगळ्यात खराब स्थितीत हा आकडा १.२२ मिलियन म्हणजेच जवळपास १२ लाखांपर्यंत जाऊ शकतो.
कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा
इंस्टीट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स एंड इवॅल्यूएशन (IHME) नं दिलेल्या माहितीनुसार २० मे ला कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असू शकते. यावेळी एका दिवसात १२ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होऊ शकतात. याआधी शास्त्रज्ञांनी १६ मे ही सर्वाधिक मृतांची संख्या वाढण्याची तारीख असल्याचे सांगितले होते .