कोरोनाच्या लढाईत भारतासह जगभरातील अनेक देश संकटांचा सामना करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाशी लढा देण्यााबाबत भारतावर विश्वास दाखवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार अमेरिका, भारत आणि ब्राझिल बलाढ्य, सक्षम देश आहेत. या देशांमधमध्ये आजारांशी लढा देण्याची क्षमता आहे. अमेरिका जगभरातील सगळ्यात जास्त कोरोना प्रभावीत देशांपैकी एक आहे. दुसऱ्या क्रमांवर ब्राझिल तर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे.
रायटर्स टॅलीनुसार अमेरिकेत गुरूवारी कोरोना व्हायरसचे ४ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. प्रत्येक तासाला २ हजार ६०० रुग्णांची नोंद होत आहे. अलिकडे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ट ट्रंप यांनी कोरोनाच्या लढ्याविरुद्ध भारताचे कौतुक केले आहे. त्यांनी सांगितले की व्यापक स्तरावर केल्या जात असलेल्या टेंस्टींगमध्ये अमेरिकेनंतर भारताचा नंबर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने याआधीही भारताचे कौतुक केले होते. काही दिवसांपूर्वी कोविड 19 बाबत भारताने सुरूवातीपासूनच तत्परता दाखवल्याचे त्यांनी सांगितले होते. मोठ्या प्रमाणावर चाचणी करणं, रुग्णालयात आपातकालीन सेवा उपलब्ध करणं आणि आवश्यक वस्तूच्या उपलब्धतेची व्यवस्था करणं या सेवांबाबत भारताने नेहमीच तत्परता दाखवली आहे.
दरम्यान भारतात वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (CSIR)ने कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी तयार केलेले फेविपिराविर हे औषध लॉन्च करण्यासाठी सिप्ला कंपनी पूर्णपणे तयार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मुळाच्या जपानच्या फुजी फार्माद्वारे विकसित करण्यात आलेल्या फेविपिराविरच्या वैद्यकिय परिक्षणादरम्यान चांगले परिणाम दिसून आले आहेत. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं होतं. CSIR ने स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रसायनांच्या साहाय्याने स्वस्तात हे औषध तयार केले आहे.
या औषधाला आपातकालिन स्थितीत वापरण्यास परवागनी मिळाली आहे. सिप्ला कंपनी आता कोरोना व्हायरसच्या संक्रमणानेग्रस्त असलेल्या लोकांचे उपचार करण्यासाठी या औषधाची मदत घेणार आहे. या संदर्भात सीएसआयआर आयआयसीआरचे प्रमुख एस. चन्द्रशेखर यांनी माध्यामांना दिलेल्या माहितीनुसार हे औषध खूप स्वस्त आणि प्रभावी ठरणार आहे. सिप्ला कमी कालावधीत जास्त औषधांचे उत्पादन करण्याच्या प्रयत्नात आहे.
व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण
भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण