मोठा दिलासा! कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी Itolizumab इंजेक्शनचा वापर होणार; DCGI कडून परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 01:48 PM2020-07-11T13:48:20+5:302020-07-11T14:01:20+5:30
CoronaVirus News & Latest Update : कोरोनाच्या माहामारीच्या काळात या इंजेक्शनला कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी परवानगी मिळाल्यामुळे आशेचा किरण दाखवला आहे.
जगभरासह भारतात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाने मृत्यू होत असलेल्यांचा धडकी भरवणारा आकडा समोर येत आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन उठवण्यात आला होता. पण कोरोनाचं संक्रमण वाढत असल्यामुळे पुन्हा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. संपूर्ण जगभरात लोक कोरोनाच्या लसीच्या प्रतिक्षेत आहेत. अशा स्थितीत एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. DGCI म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी Itolizumab Injection च्या वापराला मंजूरी दिली आहे. केवळ आपातकालीन स्थितीत या इंजेक्शनचा वापर करण्यात येईल असे ते म्हणाले आहेत.
माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक चाचण्यामध्ये Itolizumab या इंजेक्शनचे समाधानकारक परिणाम दिसून आल्यानंतर DGCI ने मंजूरी दिली आहे. कोरोनाच्या माहामारीच्या काळात या इंजेक्शनला कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी परवानगी मिळाल्यामुळे आशेचा किरण दाखवला आहे. या इंजेक्शनचा वापर सोरायसिसच्या रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात होता. बायोकॉन लिमिटेडचे हे उत्पादन आहे.
कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी आतापर्यंत गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात होता. रेमडिसीवीर या औषधांचे जेनेरिक वर्जन तयार करण्यासाठी भारतात परवागनी देण्यात आली आहे.सिप्लाने मुंबईतील बीडीआर फार्माकडून मॅन्युफॅक्चरिंगचा करार केला आहे. त्या बदल्यात बीडीआर फार्माने तयार डोस आणि पॅकेजिंगसाठी सॉवरेन फार्माशी करार केला.
सिप्लाच्या सीएफओच्या मते, हे औषध लवकरच उपचारांसाठी तयार होणार आहे. मात्र, सध्या किती डोस तयार आहेत याबद्दल त्यांनी काहीही सांगितले नाही. अहवालानुसार, सिप्ला Cipremi नावाने औषध सुमारे ४ हजार रुपये प्रति वॉयलच्या दराने विकले जाईल. म्हणजेच हेटरो ग्रुपपेक्षा ते १४०० रुपयांनी स्वस्त असेल. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय) कडून मान्यता मिळाल्यानंतर हेटरो ग्रुपने Covifor नावाने औषधांची निर्मिती व विक्री सुरू केली आहे.
आतापर्यंत केवळ त्यांचीच औषधे पुरविली जात आहेत. कंपनीने एका वॉयलची किंमत ५४०० रुपये ठेवली आहे. आतापर्यंत केवळ 20 हजार वॉयलचा पुरवठा केला आहे. सिप्लाच्या या घोषणेमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण रेमडेसिवीरची मागणी वाढत आहे. हे औषध मध्यम ते अत्यवस्थ कोविड -१९ रुग्णांच्या उपचारासाठी मंजूर केले गेले आहे.
धोका वाढला! आता कोरोना विषाणू कधीही पाठ सोडणार नाही; WHO नं दिली धोक्याची सूचना