कोरोनाच्या महामारीमुळे लैगिंक जीवनावर होत आहे गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 11:15 AM2020-05-17T11:15:19+5:302020-05-17T11:24:38+5:30
महिलांच्या लैगिंक जीवनावर कोरोनाच्या महामारीत बदल होत आहे.
कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आला आहे. कोरोनामुळे लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरचं नाही तर दिनक्रमावर सुद्धा परिणाम झाला आहे. कोरोनाची महामारी आणि यांचा लोकांवर होणारा परिणाम यांवर अनेक देशातून रिसर्च केले जात आहेत. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनानुसार कोरोना व्हायरसमुळे महिलांच्या लैगिंक जीवनावर सुद्धा परिणाम होत आहे.
कोरोनाच्या काळात महिलांची लैगिंक इच्छा वाढली असून महिलांच्या लैगिंक जीवनात सुधारणा झाली नसल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ गायनोकोलॉजी एंड ऑब्स्टेट्रिक्समध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार एसेलर मॅटरनिटी एंड चिल्ड्रन्स हॉस्पिटल टीम तुर्कीने महिलांच्या लैगिंक जीवनावर कोरोनाच्या महामारीत बदल होत आहे.
या विषयावर रिसर्च केला होता. या रिसर्चमध्ये ५८ महिलांचा समावेश होता. महिलांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या काळात आधीच्या तुलनेत महिलांचे शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. याआधी हे प्रमाण कमी होते. या रिसर्चमध्ये असं सुद्धा दिसून आलं की कोरोनाच्या काळात जास्तीत जास्त महिलांना बाळाला जन्म देण्याची इच्छा नव्हती.
या रिसर्चमध्ये समाविष्ट असेलेल्या ३३ टक्के महिलांना कोरोनाच्या माहामारीच्या आधी गर्भवती होण्याची इच्छा होती. आता फक्त पाच टक्के महिलांना गर्भवती होण्याची इच्छा आहे. आश्चर्यकारक गोष्ट अशी की, या कालावधीत गर्भनिरोधकाचा वापर कमी प्रमाणात झाला आहे. यूएनने केलेल्या रिसर्चनुसार ११४ देशात ४५ कोटी महिला गर्भनिरोधकाचा वापर करतात. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापर्यंत लॉकडाऊनशी संबंधित समस्यांमुळे ४.७० कोटी महिला या गर्भनिरोधकाचा वापर करण्यापासून वंचित राहिल्या आहेत. यामुळे सध्या इच्छा नसतानाही गर्भवती राहिलेल्या ७० लाख महिलांच्या केसेस समोर आल्या आहेत.
तुर्कीमध्ये महिलांवर करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये दिसून आलं की कोरोना संकट काळात महिलांना मासिक पाळीशी संबंधीत समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सुरूवातीला १२.१ टक्के होती. आता २७,६ टक्क्यांपर्यंत आहे. संशोधकांनी या रिसर्चमध्ये समाविष्ट असलेल्या महिलांच्या लैंगिक जीवनाबाबत माहिती मिळवण्यासाठी प्रश्नावली तयार केली होती. यातून संशोधकांनी दिसून आलं की कोरोनाच्या महामारीमुळे महिलांच्या लैगिंक जीवनात बदल घडून आला होता.
(कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीलाही करावा लागू शकतो गंभीर समस्यांचा सामना, तज्ञांचा दावा)
(पुरूषांमधील टेस्टोस्टोरॉन हार्मोन आणि कोरोना विषाणू यांच्यातील संबंध जाणून घ्या)