कोरोनाच्या वाढत्या प्रसारात वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिच्या (Washington University School of Medicine) संशोधकांनी केलेल्या संशोधनतातून एक नवीन गोष्ट समोर आली आहे. डोळ्यांमधील कोर्निया कोरोना व्हायरसच्या संक्रमणाशी प्रतिकारक करतो . कोरोनाप्रमाणेच सिंप्लेक्स आणि जिका व्हायरस यांच्या संक्रमणामुळेही कॉर्निया प्रभावित होत होता. जर्नल सेलच्या रिपोर्टनुसार तज्ज्ञ कोर्नियाप्रमाणेच इतर आजूबाजूच्या इंद्रियांवर कोरोनाचा परिणाम होतो की नाही याबाबत संशोधन सुरू आहे.
या रिपोर्टचे लेखक जोनाथन जे मायनर यांनी सांगितले की, आमच्या निष्कर्षांवरून हे दिसून येतं की, कॉर्निया प्रतिकारक आहे. आम्ही तपासणी केलेल्या प्रत्येक डोनर कॉर्निया कोरोना व्हायरससाठी प्रतिकारक होता. लोकांच्या एका गटामध्ये अशाप्रकारे कॉर्नियामुळे व्हायरस अधिक सक्रिय होत असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच व्हायरसचा प्रसार होण्यासाठी तसंच व्हायरस वाढण्यासाठी मदत होते.
जॉन एफ हार्डस्टी विभागातील प्राध्यापक राजेंद्र एस आपटे म्हणाले की, ''काही कोरोना रुग्णांमध्ये डोळ्यांसंबंधी अशी लक्षणं दिसून येतात. ज्यामध्ये डोळ्यांचा रंग लाल होतो, तीव्र वेदना होतात. पण कोरोना संक्रमणामुळे ही स्थिती उद्भवते का, याबाबत अजूनही स्पष्ट करण्यात आलेले नाही. कॉर्निया आणि कंजंक्टिवा कोरोना व्हायरसच्या रिसेप्टरर्सच्या रुपातून ओळखला जातो. या अभ्यासातून दिसून आलं की, व्हायरसने कॉर्नियामध्ये प्रतिकृती तयार केलेली नाही. ''सावधान! कोरोनामुळे फुफ्फुसांसह पचनक्रियेचंही होतंय नुकसान, २० % संक्रमितांमध्ये दिसली लक्षणं
संशोधकांना कॉर्नियल टिश्यूमधील महत्त्वाचे पदार्थ देखील आढळले जे विषाणूच्या वाढीस प्रोत्साहित करू शकतात किंवा रोखू शकतात. तज्ज्ञांनी सांगितले की, डोळ्यांना पूर्णपणे झाकणं हे इन्फेक्शन रोखण्यासाठी म्हत्वाचं ठरतं, असं अजिबात नाही. संशोधक या विषयावर अधिक अभ्यास करत आहेत. कोरोना व्हायरसचा डोळ्यांवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी मोठ्या स्तरावर वैद्यकिय परिक्षणं केलं जाणं आवश्यक आहे. खुशखबर! व्हायरसशी लढण्यासाठी कोरोनाची 'सुपर वॅक्सिन' तयार करणार, तज्ज्ञांचा दावा
कोरोनामुळे फुफ्फुसांसह पचनक्रियेचंही नुकसान
दरम्यान एब्डॉमिनल रेडियोलॉजी जर्नल (AbdominalRadiology journal) मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासात दिसून आलं की, कोरोनाने पीडित असलेल्या 20 टक्के लोकांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाईनल समस्यांचा सामना करावा लागतो. या अभ्यासात समाविष्ट असलेल्या लोकांना गॅस, उलट्या, अतिसार या समस्यांचा सामना करावा लागत होता.
जर्नल ऑफ एब्डॉमिनल रेडिओलॉजीनुसार, कोविड -19 मधील प्रत्येक पाचपैकी एका रुग्णाला पचनाच्या समस्या येत होत्या. म्हणजेच सुमारे 20 टक्के रुग्ण मळमळ, उलट्या, ओटीपोटात वेदना आणि अतिसाराने ग्रस्त होते. कोरोना रूग्णांच्या पोटाच्या रेडिओ इमेजिंगचे मूल्यांकन करून संशोधकांनी याचा निष्कर्ष काढला आहे.